माहितेय का? भारतीय महिला चक्क २२ हजार टन सोनं घालतात! वाचा सविस्तर…

माहितेय का? भारतीय महिला चक्क २२ हजार टन सोनं घालतात! वाचा सविस्तर…

भारतीय महिला सोन्यासाठी किती वेड्या असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

लग्नकार्य असो किंवा मग कोणताही सण…या दिवशी महिला सोन्याचे दागिने मोठ्या थाटात मिरवतात. सोन्याच्या दागिन्यांनी महिलांचं सौंदर्य आणखी फुलतं. भारतीय महिला सोन्यासाठी किती वेड्या असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कधीकाळी भारताला “सोने की चिडिया” असं म्हटलं जायचं. पण आज भारतीय महिलांना ‘सुवर्ण महिला’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याला कारणही तसंच आहे. तुम्हाला माहितेय का? भारतीय महिला तब्बल २४ हजार टन इतकं सोनं घालतात. हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरंय.

वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अहवालानुसार, जगात आतापर्यंत उत्खनन केलेल्या सोन्यात भारतीय महिलांचा वाटा ११ टक्के आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार, भारतीय महिलांकडे सध्या २२ हजार टन इतकं सोनं आहे. त्याचबरोबर जगातील खाणींमधून २० हजार टन सोनं काढण्यात आलं आहे. म्हणजेच प्रत्येक १०० टन सोन्यापैकी ११ टन सोनं भारतीय महिलांकडे आहे.

याची तुलना जगभरातील सेंट्रल बँकांकडे ठेवलेल्या सोन्याच्या साठ्याशी केली तर एकटा कोणताही देश भारतीय महिलांना आव्हान देऊ शकत नाही. त्यांना स्पर्धा करायची असली, तरी अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन आणि खुद्द भारत या देशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सर्व सोने घेऊन मैदानात उतरावे लागेल, तरीही ते भारतीय महिलांना मागे टाकू शकणार नाहीत.

आज जरी सोन्याचा भाव प्रत्येक १ तोळ्यासाठी (सुमारे ११.७ ग्रॅम) ५४ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे, परंतु सोन्याबाबत आणखी एक मनोरंजक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९४७ मध्ये दिल्ली ते मुंबई फ्लाइटचे भाडे १४० रुपये होते. यावेळी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८८ रुपये होता. म्हणजेच १०० ग्रॅम सोन्याची किंमत विमान भाड्याच्या जवळपास निम्मी होती.

First Published on: January 24, 2023 7:50 PM
Exit mobile version