‘आरोग्य सेतू’ ठरले १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केलेले जगातील पहिले App

‘आरोग्य सेतू’ ठरले १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी डाऊनलोड केलेले जगातील पहिले App

कोरोना रूग्णांना ट्रॅक करण्यासाठी सरकारचे 'आरोग्य सेतू' अ‌ॅप सज्ज

केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर याच्या संसर्ग प्रमाणात लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांची ओळख करून देण्यासाठी आरोग्य सेतू हे अॅप काही दिवसांपूर्वी लाँच केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्र्यांसह इतर नेत्यांनीही हे अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जनतेला वारंवार केले होते. परिणामी, आरोग्य सेतू हा कमी कालावधीमध्ये सर्वाधीक लोकांकडून डाऊनलोड करण्यात आलेला जगातील पहिला अॅप ठरला आहे. अवघ्या १३ दिवसांत तब्बल ५ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याची माहिती समोर येत आहे.

हा एक जागतिक रेकॉर्ड

आरोग्य सेतू अॅप हे आपल्या आजूबाजू फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांबाबत आपल्याला सावधान करते. तसेच देशात, राज्यात कोरोना संसर्गाची काय स्थिती आहे, याचीदेखील माहिती या अॅपमधून मिळते. याबाबत धोरण आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी बुधवारी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपला ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त १३ दिवस लागले. हा एक जागतिक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या समितीने आरोग्य सेतू अॅपची योजना प्रत्यक्षात आणली आहे. धोरण आयोग, इलेक्ट्रॉनिक आणि सुचना तसेच औद्योगिकी मंत्रालय हे या समितीत सहभागी होते.

यांनी केले अॅप डाऊनलोड

सुरक्षा सेवेतील सर्व जवानांना, माजी सैनिकांना तसेच त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना हे अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच आकाशवाणी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनाही हे अॅप डाऊनलोड करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. सैन्यात तब्बव १३ लाख जवान असून त्यांना या अॅपमुळे फायदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे उपकरण ५ कोटी लोकांपर्यंत इतक्या वेळात पोहोचले

 

First Published on: April 16, 2020 3:40 PM
Exit mobile version