भयानक! फेकलेल्या ‘सॅनिटरी पॅड’चा नशेसाठी वापर

भयानक! फेकलेल्या ‘सॅनिटरी पॅड’चा नशेसाठी वापर

प्रातिनिधिक फोटो

दारू, सिगारेट, हुक्का तसंच गांजा, चरस या गोष्टींचा नशा करणं यामध्ये आजकाल काही नवीन राहिलेलं नाही. तरूणाईमध्ये तर या पदार्थांची नशा करणं हा एकप्रकाचा ट्रेंड बनला आहे. अशाप्रकारे नशा केल्याने होणारं नुकसान हे  अटळ असलं तरी अगणित लोक याला बळी पडतातच. जे लोक नशा करण्यासाठी महागडे पदार्थ विकत घेऊ शकत नाहीत ते काही स्वस्त आणि घाणेरड्या पदार्थांचा वापर करुन नशा करतात. अशाच काही नशेड्यांनी नशा करण्यासाठी एक धक्कादायक आणि तितकाच विकृत असा प्रकार शोधून काढला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काही तरुण वापरलेले सॅनेटरी पॅड उकळून ते पाणी पिऊन त्यापासून नशा करत अाहेत. हा किळसवाणा प्रकार गेल्या काही काळापासून इंडोनेशियातील तरुण करत आहेत. वापरलेली सॅनेटरी पॅड्स पाण्यामध्ये उकळायची आणि ते पाणी पिऊन नशा करायचा असा असा प्रकार हे इंडोनेशियन तरुण करत आहेत. या भयानक नशामुळे त्यांच्या आरोग्याला खूप मोठी हानी पोहचत असल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा जीवघेणा नशा करणारे तरुण हे पाणी पिऊन उत्तम नशा होतो असं सांगतात. एका तरुणाच्या सांगण्यानुसार, सॅनेटरी पॅडचा नशा त्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. त्याला हवेमध्ये तरंगल्याचा भास होतो. दरम्यान, नॅशनल नारकोटिक्स एजन्सीचे वरिष्ठ कमांडर सुप्रिनर्टो यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, पॅडचा नशा करणारे हे तरुण कचऱ्यातून वापरलेले पॅड्स उचलतात, त्यानंतर ती पॅड्स पाण्यात उकळवतात आणि ते पाणी थंड झाल्यावर पितात. मात्र, पुढे त्यांनी सांगितले की सॅनिटरी पॅडमध्ये असलेला सोडियम पॉलीक्रायलेट हा घटक (जो द्रव्य शोषून घेतो) शरीरासाठी अत्यंत घातक असतो. हा शरीरात गेल्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. एका स्थानिक वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये, इंडोनेशिया चाइल्ड प्रोटेक्शन कमीशनचे सदस्य Sitty सिट्टी हिकमावट्टी यांनी म्हटलं आहे, की, जे लोक ड्रग्स किंवा अल्कोहोल खरेदी करु शकत नाहीत, त्यांच्यांसाठी नशा घेण्याचा हा स्वस्त पर्याय आहे. वापरलेले सॅनेटरी पॅड्स कचरापेटीतून अगदी फुकट मिळून जातात ज्याचा वापर करुन नशा केला जातो. मात्र, अशाप्रकारचा नशा जीवघेणा ठरू शकतो.

First Published on: November 17, 2018 7:49 PM
Exit mobile version