चिदंबरम आणि कार्तिला मी ५० लाख डॉलर्स दिले – इंद्राणी मुखर्जी

चिदंबरम आणि कार्तिला मी ५० लाख डॉलर्स दिले – इंद्राणी मुखर्जी

इंद्राणी मुखर्जी

आयएनएक्स मीडिया प्रकरणाबाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांची ईडीकडून कसून चौकशी देखील सुरु आहे. दरम्यान, आयएनएक्स मीडिया कंपनीची मालकीन आणि शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने या भ्रष्टाचारबाबत मोठा दावा केला आहे. ती सध्या या गैरव्यव्हार प्रकरणी माफीची साक्षीदार बनली आहे. पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरमला विदेशात आपण ५० लाख डॉलर्स दिल्याचा तिने केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांची आयएनएक्स मीडिया ही कंपनी आहे. या कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडाळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा गैरव्यव्हार झाला तेव्हा पी. चिदंबरम देशाचे केंद्रीय अर्थमंत्री होते. त्यांनीच हा गैरव्यव्हार करुन ३०५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. २००७ साली हा गैरव्यव्हार झाला होता आणि सीबीआयने याप्रकरणी २०१७ साली तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात इंद्राणी ही माफीची साक्षीदार आहे. तिनेच सिंगापूर, मॉरिशयस, बर्म्युडा, इंग्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये असताना पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ति यांना ५० लाख डॉलर्स दिल्याचा दावा केला आहे.

First Published on: October 19, 2019 1:28 PM
Exit mobile version