INS Vikrant Scam: ‘ती’ रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांची कोठडीची मागणी – वकील प्रदीप घरत

INS Vikrant Scam: ‘ती’ रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांची कोठडीची मागणी – वकील प्रदीप घरत

INS Vikrant Scam: 'ती' रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी सोमय्या पिता-पुत्रांची कोठडीची मागणी - वकील प्रदीप घरत

आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणातील भाजप नेते किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून मुंबई सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आज संध्याकाळपर्यंत सोमय्या पिता-पुत्रांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या युक्तिवादा दरम्यान शासना तर्फे सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याप्रकरणातील ती रक्कम कुठे गेली हे शोधण्यासाठी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्या कोठडीची मागणी केल्याची माहिती दिली.

सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनावरील युक्तिवाद झाल्यानंतर वकील प्रदीप घरत म्हणाले की, ‘शासना तर्फे अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. कारण जी तक्रार आहे, त्या तक्रारीप्रमाणे चर्चेगेट रेल्वे स्टेशनजवळ, तसेच इतर काही रेल्वे स्टेशन जवळ विक्रांतच्या दुरुस्तीसाठी निधी जमा केला गेला. आणि ज्यावेळेला राज्यभवनावर सदर निधी मिळालाय का? अशी विचारणा केली गेली. त्यावेळेला राज्यभवनावरून उत्तर दिले गेले की, असा कोणताही निधी त्यांच्याकडे सोपवला गेला नव्हता.’

निधी गोळा करण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली नाही – घरत 

पुढे घरत म्हणाले की, ‘आरोपींनी न्यायालयामध्ये जी सादरपत्र सादर केली असून त्यामध्ये जे फोटोग्राफर आहेत, त्याप्रमाणे दोन्ही आरोपी स्टिलच्या डब्यातून विक्रांतचे टी-शर्ट घालून आणि डब्ब्यावर युद्धनौका वाचवण्यासाठी असे लिहिले होते. त्याच्यामध्ये पैसे गोळा करत होते, त्या पैशाबद्दल कोणालाही पावती दिलेली नाही. ते पैसे गोळा करण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली गेली नाही, असे मुद्द कोर्टात उपस्थित केले गेले. तसेच त्यांनी दाखवलेले जे मुद्दे होते, त्याप्रमाणे विक्रांतला खरोखर वाचवण्यासाठी पैशाची गरज होती. त्यांनी दाखवलेल्या कागदपत्राप्रमाणे बीएमसीने किंवा संरक्षण मंत्रालयाने जी हमी घेतली होती की, विक्रांत वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण सदरील पैसे दोन्ही संस्थांनी न दिल्यामुळे शेवटी विक्रांत ही भंगारत काढण्यात आली आणि आरोपींनी जमा केलेल्या पैशातील एक पैसा सुद्धा दिला नाही. त्यांचे म्हण होते की, आम्ही यांच्यातील साडे अकरा हजार रुपये जमा केले. शेवटी अपहार हा अपहार असतो तो एक पैशाचा असो किंवा कोटी रुपयांचा असो. ही रक्कम कुठे गेली, याचाच पोलिसांना तपास करायचा आहे. त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराप्रमाणे हे पैसे त्यांनी राजभवनला दिले, राज्यपालांना सोपवले. पण त्यांच्या कार्यालयाकडून सांगितले जातेय की, है पैसे आमच्याकडे आलेले नाहीत. तर ही रक्कम कुठे गेली, ही शोधण्यासाठी आरोपींची कोठडी गरजेची आहे.’


हेही वाचा – सोमय्या, दरेकरांनी चौकशीला सामोरे जावे; कर नाही तर डर कशाला?, अतुल लोंढेंचा सवाल


 

First Published on: April 11, 2022 3:00 PM
Exit mobile version