पृथ्वीपेक्षाही चंद्रावर जमीन स्वस्त! त्रिपुराच्या शिक्षकाने फक्त ६ हजार रुपयांत घेतली चंद्रावर जमीन; तुम्हालाही मिळू शकते संधी

पृथ्वीपेक्षाही चंद्रावर जमीन स्वस्त! त्रिपुराच्या शिक्षकाने फक्त ६ हजार रुपयांत घेतली चंद्रावर जमीन; तुम्हालाही मिळू शकते संधी

पृथ्वीपेक्षाही चंद्रावर जमीन स्वस्त! त्रिपुराच्या शिक्षकाने फक्त ६ हजार रुपयांत घेतली चंद्रावर जमीन; तुम्हालाही मिळू शकते संधी

चंद्रावर जाणे आणि तिथे जमीन खरेदी करणे हे ऐकण्यास सोप्पे नसले तरीही त्रिपुराच्या एका शिक्षकाने स्वतःला व्हॅलेटाईन डेला (Valentines Day) चंद्रावरील एक एकर जमीन (Land on Moon) भेटवस्तू म्हणून देण्याचा दावा केला आहे. या व्यक्ती म्हटले की, तो बॉलिवूड स्टार्सकडून प्रेरित झाला आहे, ज्यांनी चंद्रावर स्वतः प्रॉपर्टी (Property) खरेदी केली आहे.

चंद्रावर खरेदी केला भूखंड

माध्यमांच्या वृत्तानुसार, त्रिपुराचे एक शिक्षक सुमन देबनाथ (Suman Debnath) यांनी आंतरराष्ट्रीय लूनर सोसायटीकडून (International Lunar Society) जवळपास ६ हजार रुपयांत चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. देबनाथ म्हणाले की, ‘बॉलीवूड स्टार्सची स्वतःची चंद्रावर आपली जमीन असते आणि त्यांच्यामुळे मी प्रेरित झालो. मला वाटत होते की, हे सोप्पे काम नाहीये आणि चंद्रावरची जमीन खूप महाग असेल. पण चंद्रावर जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंटरनेट ऑप्शन्स सर्च केले. त्यानंतर चंद्रावरच्या जमीन इतक्या महाग नाहीत, जितका विचार केला होता, हे त्यांना कळाले.

देबनाथ यांनी आपला अनुभव शेअर करत सांगितले की, एकूण सहा हजार रुपये खर्च करावे लागले. ज्यामध्ये चंद्राच्या एक एकर जमीनचे शिपिंग आणि पीडीएफ चार्ज सामील आहे. एक आंतरराष्ट्रीय लूनर सोसायटी आहे, जी चंद्रावरील जमीनबाबत डील करते. येथूनच त्यांनी खरेदी केली आहे. देबनाथांच्या माहितीनुसार, त्यांच्या राज्यात यापूर्वी कोणत्याही व्यक्तीने चंद्रावर जमीन घेतली नव्हते. हा अनुभव ओव्हर-द-मून असल्याचे त्यांनी सांगितले.

सुमन देबनाथ गणितात पोस्ट-ग्रॅज्युएट असून ते एका खासगी अकादमीमध्ये शिकवतात. देबानाथ यांनी दावा केला की, जमीन रजिस्टर केली गेली आहे. कागदपत्र आणि हार्ड कॉपी लवकरच त्यांच्या जवळ पोहोचतील. चंद्रावर जमीन घेतल्यामुळे देबनाथ खूप उत्साहित आहेत.

चंद्रावर पृथ्वीपेक्षा स्वस्त जमीन

देबनाथ सांगतात की, या डीलमध्ये त्यांना हे माहित झाले आहे की, चंद्रावरच्या जमिनीची किंमत पृथ्वीवरील प्लॅटपेक्षा जास्त स्वस्त आहे. चंद्रावरची जमीन भूखंडप्रमाणे विभागला जाते. जेव्हा त्यांना याबाबत कळाले होते, तेव्हा बरेच भूखंड विकले होते. पण चंद्रावर घर बनवण्याची आणि राहण्याची त्यांची काही योजना नाही. परंतु चंद्रावर स्वतःची जमीन असणे खूप चांगले वाटते आणि यामुळे त्यांचे आई-वडील खूप आनंदी आहेत.’


हेही वाचा – Corona: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना कोरोनाची लागण; लवकर प्रकृती सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींची प्रार्थना


 

First Published on: February 21, 2022 3:38 PM
Exit mobile version