इन्स्टाग्रामवरील २४ लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीचा मृत्यू

इन्स्टाग्रामवरील २४ लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीचा मृत्यू

इंस्टाग्रामवरील २४ लाख फॉलॉअर्स असलेल्या मांजरीचा मृत्यू

आजच्या जमानात आपले फोटोज शेअर करण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करतात. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्रामसह व्हॉटस्अॅपचा देखील वापर केला जातो. दरम्यान, इन्स्टाग्रामचा अधिक वापर करत यावर अनेक निरनिराळे पेज देखील पाहायला मिळतात. तसेच वेगळ्या श्रेण्यांमधून आपल्याला फोटो आणि व्हिडिओ पाहता येतात. तर या वेगळ्या श्रेण्यांमधून, प्राणी, खाद्य आणि ट्रैवल या श्रेण्या लोकांना फार आवडतात. अनेक लोकं आपल्या पाळीव प्राण्यांचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट बनवतात आणि त्यांच्या रोजच्या जिवनाचं गंमतीशीर फोटो आणि व्हिडिओ देखील टाकतात. अशा प्राण्यांच्या पेजला अनेक फॉलॉअर्स देखील असतात आणि हे प्राणी इन्स्टाग्रामचे सेलिब्रिटी बनतात. अशीच एक इन्स्टाग्रामची सेलिब्रिटी म्हणजे अमेरीकेतील बब नावाची मांजर. ही प्रसिद्ध असणाऱ्या मांजरीचा १ डिसेंबरच्या रात्री दुर्दैवाने झोपेतच मृत्यू झाला असून तिला हाडात संसर्ग झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबद्दल तिच्या मालकानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

बबमध्ये काय वेगळं होतं? 

बब ही एक साधारण मांजर नसून एक फार अनोखी मांजर होती. माइक ब्रिडावस्की नावाच्या गृहस्थाला बब त्याच्या मित्राच्या स्टोअर रुममध्ये तिच्या इतर भाऊ बहिणींसह भेटली आणि माइकनं तिला दत्तक घेतलं. बबला पिल्लू असल्यापासूनच अनेक त्रास होतं. मोठी झाली असूनही पिल्ला इतकीच, बटाटे डोळे असणारी, जिभ  कायम तोंडाबाहेर लटकणारी आणि गोंडस असा चेहरा असणारी, अशी काही दिसायची बब. तिला बौनेपणा असल्यामुळे ती कधी जास्त मोठी झालीच नाही. तिला दात नसल्यामुळे आणि खालचा जबडा छोटा असल्यामुळे तिची जिभ कायम बाहेर लटकायची. एका मुलाखतीत माइकनं सांगितले आहे की, बब ही इतर मांजरींपेक्षा वेगळी आणि अनोखी म्हणून जन्माला आली आहे. तिला इतके त्रास असूनही ती एक आनंदी आयुष्य जगायची आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांना देखील खूप खुश ठेवायची.

बब कशी प्रसिद्ध झाली? 

२०११ मध्ये माइकनं बबचं टम्ब्लर वर ब्लॉग बनवलं आणि त्यानंतर तिचे फोटो हे व्हायरल झाले. त्यानंतर तिला फार प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रात लेख, टि. व्ही. शोसाठी आमंत्रण देखील तिला मिळालं, तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल देखील आहे. तर माइकनं बबचा एक ब्रँड बनवून तिचे फोटो असलेल्या वस्तू ऑनलाइन विकू लागला. तर या व्यापारामधून जे पैसे मिळायचे त्या पैश्यांचा वापर बब सारख्या अनोख्या प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला दिला जायचा. बबनं आपल्या आयुष्याभरात अशा अनोख्या प्राण्यांसाठी ७ लाख डॉलर्सची रक्कम जमा केली. बबकडून तिच्या चाहत्यांनी अनेक गोष्टी देखील शिकल्या. इतकं शारिरीक त्रास असूनही आपलं आयुष्य आनंदानं कसं जगायचं ही गोष्ट बबनं सगळ्यांना शिकवली.

प्राण्यांना जरी बोलता नाही आलं तरी त्यांच्याकडून कित्येक गोष्टी शिकू शकतो हे बबनं दाखून दिलं. प्रेम करणं, छोट्या गोष्टीत आनंद मिळवणं, आपल्या जवळच्यांना नेहमी आठवण करून देणं की आपण त्यांच्यावर प्रेम करतो या सगळ्या गोष्टी माणूस आपल्या रोजच्या आयुष्यात विसरून जातो तर त्याला त्याची आठवण करून देण्यासाठीच या जगात प्राणी आहेत हे बोलणं काही चुकीचं नाही.


हेही वाचाः डोंबिवली ट्रेनच्या गर्दीचा विषय थेट संसदेत; सुप्रिया सुळेंनी केली ही मागणी

First Published on: December 3, 2019 7:10 PM
Exit mobile version