Intel चे अर्धशतक पूर्ण

Intel चे अर्धशतक पूर्ण

इंटेलच्या सोहळ्या दरम्यान टिपलेले काही क्षण

संगणकासाठी लागणारे प्रोसेसर आणि चीप निर्मीतीतील जगातील बलाढ्य कंपनी ‘इंटेल’ कंपनीने नुकतेच अर्धशतक पूर्ण केले आहे. हा सुवर्ण महोत्सवी उत्सव कंपनीने मोठ्या जल्लोशात साजरी केला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे २ हजार ड्रोन उडवून इंटेलने गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. या ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध आकृत्या बनवून (लाईट शो) काही वेळ लोकांना खिळवून ठेवले आहे. हवेत या ड्रोन्सनी हवेत डान्सिग बॉडी, फिरते जग आणि इंटेलच्या लोगोचा आकार बनवला. फॉल्सममधील कंपनीच्या आवारात हे ड्रोन्स उडवण्यात आले. जमिनीपासून शंभर फुटांवर त्यांनी हे आकार बनवले. कार्यक्रमाला सुरुवात झाल्याच्या काही वेळातच या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. याच ठिकाणाहून काही अंतरावर असलेले फॉल्सम हायस्कूलमधून फटाकेबाजी सुरु असल्याचा भास लोकांना झाला.

या कार्यक्रमाव्यतिरीक्त कंपनीने शहरातील विविध ठिकाणी वेग वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अनेक व्हिडिओ टाकण्यात आले आहेत. यामध्ये मागील ५० वर्षात कंपनीने केलेल्या वाटचाली बद्दलचा अहवाल सादर करण्यात आला. दक्षिण कोरिया येथे २०१८ ला झालेल्या ऑलंपिक गेम दरम्यानही ‘इंटेल’ने अशाच प्रकारचा लाईट शो दाखवला होता. इंटेलचे शूटिंग स्टार ड्रोन हे मानव रहित आहेत. लोकांच्या मनोरंजनासाठी एलईडी लाईट्ससह हे ड्रोन आकाशात सोडण्यात आले होते. संगणकाच्या क्षेत्रात प्रोसेसर निर्मीतीमध्ये इंटेल अग्रगण्य कंपनी आहे. मोबाईल प्रोसेसर निर्मितीमध्ये कंपनी लक्षवेधक कामगिरी करु शकली नाही तरीही जगात वापरले जाणारे अधिकतर प्रोसेसर हे इंटेल कंपनीनेच तयार केलेले असतात.

इंटेल कंपनीची स्थापना १८ जूलै १९६८ रोजी झाली होती. यू.एस. मधील कॅलिफोर्निया येथील सांता क्लारा शहरात याचे मुख्यालय आहे. गॉर्डन मूर, रॉबर्ट नुयस,अँड्र्यू ग्रोव्ह या तीन तरुणांनी याची स्थापना केली होती. सध्या १ लाख ६ हजार कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत.

First Published on: July 19, 2018 8:05 PM
Exit mobile version