अमेरिकेत खळबळ! बिल क्लिंटन, ओबामांच्या हत्येचा कट

अमेरिकेत खळबळ! बिल क्लिंटन, ओबामांच्या हत्येचा कट

या वृत्तामुळे अमेरिकेमध्ये खळबळ

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या घरात बॉम्ब आढल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. इतकंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यालयामध्ये बॉम्ब आढळून आला. या दोन्ही घटनांमुळे अमेरिकेमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलेरी क्लिंटन यांच्या घरी येणारी टपाल गाडी तपासणाऱ्या कर्मचाऱ्याला हा बॉम्ब आढळून आला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे, की अमेरिकेतील एक गुप्तहेर संस्थादेखील या प्रकरणाच्या तपासात सहभागी आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, बिल आणि हिलरी क्लिंटन यांच्या न्यूयॉर्क येथील निवासस्थानी पार्सलच्या माध्यमातून हा बॉम्ब पाठवण्यात आला होता. बराक ओबामा यांच्या कार्यालयातही पार्सलच्या माध्यमातूनच बॉम्ब पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. याआधी  अमेरिकेचे उद्योगपती जॉर्ज सोरेस यांच्या घराबाहेरही स्फोटक वस्तू आढळून आल्या होत्या.

First Published on: October 24, 2018 7:57 PM
Exit mobile version