COVID Travel Guidelines : लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही, ‘या’ देशाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

COVID Travel Guidelines : लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही, ‘या’ देशाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

फ्लाईटमध्ये महिला झाली कोरोना पॉझिटीव्ह, बाथरुममध्ये केलं क्वारनटाईन

कोरोनाविरोधी लसीकरण पूर्ण झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडेच कंबोडिया देशाचे पंतप्रधान हुन सेन यांनी देशात बहुसंख्य नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीकरण पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे  लसीकरण पूर्ण झालेल्या विदेशी प्रवाशांनाही आता कंबोडियात आल्यानंतर क्वारंटाईन होण्याची गरज नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कंबोडियात आल्यानंतर आता लसवंत नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्याची सक्ती केली जाणार नाही, परंतु प्रत्येक प्रवाशाची कोरोना चाचणी ही केली जाणार आहे. सार्वजनिकरित्या जारी केलेल्या एका विशेष ऑडिओ संदेशात पंतप्रधान म्हणाले की, या नव्या गाईडलाईन्स २२ नोव्हेंबरपासून लागू केल्या जातील.

कंबोडियामध्ये एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८८ टक्के लोकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आल्याने, आता अशा लोकांना  क्वारंटाईन राहण्याची गरज नाही, असं एका वृत्तसंस्थेने हुन सेन यांचा हवाला देत म्हटले. यामुळे कंबोडियात येणारे कंबोडियन प्रवाशी आणि विदेशी प्रवाश्यांना यापुढे क्वारंटाईन होण्याची गरज लागणार नाही, परंतु ज्यांचे लसीकरण पूर्ण न झालेल्या प्रवाशांना संपूर्ण १४ दिवस क्वारंटाईन राहणे सक्तीचे आहे. असेही ते म्हणाले.

 पीसीआर चाचणी बंधनकारक

परंतु कंबोडिया देशात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (पीसीआर) चाचणी होणार आहे. या चाचणीच्या रिपोर्टची प्रत्येकजण त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांचे मित्र आणि नातेवाईकांच्या घरी राहून वाट पाहू शकतात. यासाठी एअरपोर्टवरचं थांबण्याची गरज नाही. यावर पंतप्रधान हुन सेन म्हणाले, “जेव्हा या पीसीआर रिपोर्टमध्ये कोरोना निगेटिव्ह असे दिसेल तेव्हाच त्या प्रवाशाला जिथे जायचे असेल तिथे जाण्याचा अधिकार असेल.”

पंतप्रधान हुन सेन पुढे म्हणाले की, जे प्रवासी विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. परंतु त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत अशा प्रवाशांना सोमवारपासून क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.

कंबोडियामध्ये आढळले ५५ नवीन रुग्ण

कंबोडियामध्ये गेल्या २४ तासांत ५५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ११९,५३६ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २८६७ झाली आहे. तर कोरोनावर मात करून आणखी ६२ रुग्ण बरे झाले असून, एकूण बरे झालेल्यांची संख्या ११५९२४ झाली आहे.


 

First Published on: November 16, 2021 8:01 AM
Exit mobile version