International Nurses Day: कोरोनाने पतीचा मृत्यू, तरीही मनोरमा यांनी कोरोनाग्रस्तांची केली सेवा

International Nurses Day: कोरोनाने पतीचा मृत्यू, तरीही मनोरमा यांनी कोरोनाग्रस्तांची केली सेवा

International Nurses Day: कोरोनाने पतीचा मृत्यू, तरीही मनोरमा यांनी कोरोनाग्रस्तांची केली सेवा

सिम्सच्या ज्येष्ठ परिचारिका मनोरमा लकड़ा तिर्की या सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी आली तेव्हापासून मनोरमा या कोरोना रूग्णांची मनापासून सेवा करताय. स्वतःच्या पतीचा जीव कोरोनाने गेल्यानंतरही मनोरमा यांनी न डगमगता आपले कार्य अविरत सुरू ठेवले. पतीच्या निधनाचे वृत्त समजले असतानाही मनोरमा यांनी कोरोना वॉर्डमधून माघार घेतली नाही तर त्या अखंड सेवा बजावत आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय सिम्सने कोरोना वॉर्डमध्ये अनुभवी नर्सिंग स्टाफला जबाबदारी दिली. हे ऐकून काही परिचारिका घाबरल्या तर दुसरीकडे, रुग्णांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या बहुतेक परिचारिका आनंदाने तयार झाल्या. या परिचारिकांपैकी एक ज्येष्ठ परिचारिका म्हणजे मनोरमा लकडा. त्या निर्भीडपणे कोरोना रूग्णांची सेवा करण्यास तयार झाल्यात. यानंतर, मनोरमा यांनी एप्रिल २०२० पासून सिम्स कोविड ओपीडीमध्ये सेवा सुरू केली. मे महिन्यात सिम्समध्ये कोरोना रूग्णांच्या घटना वाढत गेल्यात. पण मनोरमा यांनी सप्टेंबरपर्यंत सुट्टी न घेता सलग काम केले. ऑक्टोबरमध्ये त्यांचा नवरा अनुज तिर्कीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर तिने आपल्या पतीच्या सेवेसाठी रजा घेतली.

मात्र १३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे मनोरमाला मोठा धक्का बसला आणि दोन लहान मुलांच्या भविष्याबद्दल चिंता सुरू झाली. कोरोना ड्युटी करून आपल्या मुलांना धोका देणे योग्य होणार नाही, मुलांनी काही झाले तर त्यांचे काय होईल? असा विचार त्यांच्या मनात आला. तर दुसरीकडे, कोरोनामुळे ग्रस्त रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या स्थितीबद्दल माहिती होती. अशा परिस्थितीत, मनोरमा या पतीच्या मृत्यूनंतर काही दिवसातच कोविड ड्यूटीसाठी पुन्हा रूजू झाल्यात. पूर्वीप्रमाणे आत्मविश्वासाने आणि समर्पणाने त्यांनी रुग्णांची सेवा सुरू केली.

मनोरमा यांच्यावर दुहेरी जबाबदारी सध्या असून त्या दररोज आठ ते दहा तास कोविड रूग्णांची सेवा करतात. त्यानंतर घरी दोन लहान मुलं यांची जबाबदारी देखील त्या पार पाडत आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांच्या मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी मनोरमा यांच्यावर आहे. तरीही, त्या कोरोना रुग्ण सेवेत सतत गुंतलेल्या आहे.

First Published on: May 12, 2021 3:27 PM
Exit mobile version