International Women’s Day : राष्ट्रपतींच्या हस्ते आज 29 महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मान, पंतप्रधान मोदींची उपस्थिती

International Women’s Day : राष्ट्रपतींच्या हस्ते आज 29  महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मान, पंतप्रधान मोदींची उपस्थिती

International Women's Day : राष्ट्रपतींच्या हस्ते आज 29 महिलांचा 'नारी शक्ती' पुरस्काराने होणार सन्मान, पंतप्रधान मोदींचीही चर्चासत्राला राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची भेट घेतली. महिला दिनाच्या एक दिवस आधी त्यांनी या पुरस्कार विजेत्या महिलांची भेट घेत त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे विचार शेअर केले. या पुरस्कार विजेत्या महिलांचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते 29 महिलांचा ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंगळवारी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त 2020 – 2021 साठीचा ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान केले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला आहे. सर्व 28 पुरस्कार 29 महिलांना प्रदान केले जातील, ज्यामध्ये 2020 साठी 14 आणि 2021 साठी 14 पुरस्कारांचा समावेश असेल. महिला सबलीकरणासाठी अतुलनीय सेवा करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 2020 चा पुरस्कार सोहळा 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे होऊ शकला नाही.

सन 2020 साठी ‘नारी शक्ती’ पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवोपक्रम, सामाजिक कार्य, कला, हस्तकला, ​​STEMM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषध आणि गणित) आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. 2021 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला, हस्तकला, ​मर्चंट नेव्ही, STEMM, शिक्षण, साहित्य, अपंग व्यक्तींचे हक्क इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा समावेश आहे.

 पंतप्रधान मोदी महिला दिनानिमित्त धोर्डोमधील महिला तपस्वींच्या चर्चासत्राला राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरातच्या कच्छमधील धोर्डो येथील महिला तपस्वींच्या चर्चासत्राला संबोधित करतील. पीएमओने सांगितले की, मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिला संतांना संबोधित करतील. महिला संतांची समाजातील भूमिका आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान ओळखण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात 500 हून अधिक महिला तपस्वी आणि धर्मोपदेशक सहभागी होणार आहेत.

या चर्चासत्रात संस्कृती, धर्म, महिला उत्थान, सुरक्षा, सामाजिक स्थिती आणि भारतीय संस्कृतीतील महिलांची भूमिका या विषयांवर सत्रांचा समावेश असेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांद्वारे महिलांच्या उपलब्धीसोबतच महिलांनाही लाभ मिळत आहे, यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यात म्हटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती आणि भारती प्रवीण पवारही या चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय साध्वी ऋतंभरा, कनकेश्वरी देवी महा मंडलेश्वर यांच्यासह अन्य लोकही सहभागी होणार आहेत.


 

First Published on: March 8, 2022 8:56 AM
Exit mobile version