Internet Blackout : …तर आजपासून तुमचं इंटनेट होणार बंद, जाणून घ्या कारण

Internet Blackout : …तर आजपासून तुमचं इंटनेट होणार बंद, जाणून घ्या कारण

Internet Blackout : ...तर आजपासून तुमचं इंटनेट होणार बंद, जाणून घ्या कारण

देशातील लाखो मोबाईल, कम्प्युटर्स आणि गेमिंग कन्सोलचा इंटरनेट वापर आजपासून म्हणजेच ३० सप्टेंबरपासून पूर्णपणे बंद होणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून Internet Blackout ही चर्चेचा विषय राहिला आहे. या डिव्हाइसेसमधील सर्टिफिकेट एक्सपायर होणार असल्याने जगभरातील अनेक डिव्हासइसेसचे इंटनेट कनेक्शन बंद होणार आहे. त्यामुळे लाखो युजर्सला इंटरनेटपासून दूर राहवं लागण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम जुन्या मोबाईल, कंम्प्युटर डिव्हाइसवर होणार आहे.

Internet Blackout म्हणजे नेमकं काय?

अनके डिव्हाइसेजमधील IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट ३० सप्टेंबरपासून एक्सपायर होणार आहे. या सर्टिफेकेटचा वापर दोन डिव्हाइसचे कनेक्शन सुरक्षितरित्या एनक्रिप्ट करण्यासाठी होतो. या एन्क्रिप्शनमुळे वर्ल्ड वाईड वेब (WWW) सर्च करताना तुमचा प्रायव्हेट डेटा कोणी चोरु शकत नाही. त्यामुळे IdentTrust DST Root CA सर्टिफिकेट एक्सपायर झाल्याने कोणत्या मोबाईल डिव्हाईसवर परिणाम होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

‘या’ डिव्हाइसचे इंटरनेट कनेक्शन होणार बंद

नियमित अपडेट न करणाऱ्या डिवाइसचे इंटरनेट कनेक्शन Internet Blackout बंद होऊ शकते, अशी माहिती TechCrunch ने दिली आहे. त्यामुळे नवीन आणि अपडेटेड डिव्हाइसवरील इंटरनेटवर याचा काही एक परिणाम होणार नाही. मात्र खालील डिव्हाइसेसवरील इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे.

Android 7.1.1 किंवा त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवरील स्मार्टफोनवरील इंटरनेटव बंद होऊ शकते. याशिवाय iOS 10 आणि त्यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले iPhones, iPads, macOS 2016 असलेले कम्प्युटर्स , Windows XP आणि त्याआधीची ऑपरेटिंग सिस्टम असेलेले pc, PS3 आणि PS4 हे गेमिंग कन्सोल , Blackberry डिव्हाइसेसमधील इंटरनेट कनेक्शन बंद होऊ शकतात. यामुळे तुमच्या ऑनलाईन पेमेंट सिस्टम किंवा एटीएम पेमेंटवरही परिणार होईल.

Internet Blackout मधून वाचण्यासाठी सोप्पी पद्धत

या Internet Blackout पासून वाचण्यासाठी काही सोप्प्या पद्धती आहेत. त्या म्हणजे तुमचा स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्यूटर इत्यादी वस्तू नेहमी अपडेट करत रहा. तर Windows युजर PC च्या कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन Windows Update नेहमी चेक करत जा. याशिवाय iMac, iPad आणि Apple चे युजर्स ऑपरेटिंग सिस्टमच्या सेटिंग्समध्ये जाऊन लेटेस्ट अपडेट मिळत रहा. Android युजर डिवाइस सेटिंग्समध्ये जाऊन अबाउट फोनवर टॅप करून OS चा लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करु शकतात. अशाप्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल, कम्प्युटर किंवा गेमिंग कंसोल Internet Blackout पासून सुरक्षित ठेवू शकता.


 

First Published on: September 30, 2021 10:26 AM
Exit mobile version