कोरोनासाठी चीन नाही तर अमेरिका, इस्त्रायल आणि ज्यू जबाबदार

कोरोना व्हायरसच्या कहराने संपू्र्ण जग त्रासले असताना इराणने कोरोना व्हायरस महामारीसाठी अमेरिका इस्त्रायल आणि ज्यू जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. येथील’ इराण वायर’ या स्थानिक वृत्तपत्रात दोन पत्रकारांनी इराण सरकारने अमेरिकेसह इतर देशांवर केलेल्या आरोपांचा उल्लेख केला आहे

इराणचे नेते अयातु्ल्लाह खोमेनी यांनी सुरुवातीला कोरोनाला गांभीर्याने घेतले नव्हते. इराणी नागरिकांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी जनतेला सांगितले होते. यामुळे नागरिक बिनधास्तपण वावरत होते. यामुळे इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही येथे चीन व इटलीच्या तुलनेत अधिक झाली. त्यानंतर मात्र इराण सरकारने कोरोनाचे खापर अमेरिका, इस्त्रायल व ज्यूंवर फोडण्यास सुरुवात केली आहे. सध्या इराणमध्ये ५८ हजार कोरोना पॉझीटीव्ह आहेत. २२ मार्च रोजी खोमेनी यांनी अमेरिकेवर निशाणा साधत कोरोनाशी लढण्यासाठी ज्यांनी कोरोनाला जन्माला घातले त्या अमेरिकेची कधीही मदत घेणार नसल्याचे सांगितले होते. कोरोना व्हायरसला राक्षसांनी जन्माला घातल्याचाही त्यांनी आरोप केला होता. आता त्यात इस्त्रायल व ज्यूंचाही समावेश करण्यात आला असून कोरोनावर हेच देश लस शोधतील व जगात विकून पैसे कमावतील असेही इराणणे म्हटले आहे.

First Published on: April 6, 2020 5:15 PM
Exit mobile version