इराणमध्ये लँडिंग दरम्यान विमान अपघात; १५ जणांचा मृत्यू

इराणमध्ये लँडिंग दरम्यान विमान अपघात; १५ जणांचा मृत्यू

इराणमध्ये विमान अपघात

इराणची राजधानी तेहरानमध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. लँडिंग दरम्यान बोइंग विमानाला अपघात झाला आहे. बोइंग ७०७ किरगिज मालवाहू विमानाला खराब हवामानामुळे अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराज विमानतळावर हवामान खराब असल्यामुळे लँडिंग दरम्यान पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले. या विमानामध्ये १६ जण होते. यामध्ये १५ जणांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर एक जण सुदैवाने वाचला. यामधील ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मालवाहू बोइंग ७०७ विमान लँडिंग दरम्यान रनवे वरुन पुढे निघून गेले आणि अपघात झाला.

असा झाला विमान अपघात

इराणच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर विमान रनवेवरुन पुढे जाऊन भिंतीला जाऊन धडकले. या अपघातामध्ये एअरपोर्टची भिंत कोसळली आहे. त्याच्या आसपास असलेल्या घरांचे देखील नुकसान झाले. या अपघातानंतर विमानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

एक जण सुदैवाने वाचला

विमानामध्ये १६ जण होते. या अपघातामधेय १५ जणांचा मृत्यू झाला तर विमानामधील इंजिनिअर सुदैवाने वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईराणी सेनेचे मालवाहू विमान किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून मांस घेऊन येत होते. आयआरआयबीने सांगितल्यानुसार, विमान रनवेवर उतरताना पायलटने ते चुकीच्या रनवेवर उतरवले. त्यानंतर विमान भिंतीला जाऊन धडकले. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

First Published on: January 14, 2019 3:03 PM
Exit mobile version