अरेरे! इराणी नागरिकांनी करोनाला चाटलं – पाहा व्हिडीओ

जगभरात मृत्यूचे थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसमुळे चीननंतर इराणमध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कामानिमित्त गेलेला एक इराणी नागरिक देशात परताच तो करोना घेऊनच. त्यानंतर करोनाने इराणला विळखाच घातला. पण इराणमध्ये एवढ्या मोठ्य़ा प्रमाणावर करोनाचा फैलाव होण्यामागे विविध कारण सांगितली जात असतानाच काही दिवसांपूर्वी इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक धक्कादायक व्हिडिओही व्हायरल झाला. जो बघून कोणाच्याही अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओमध्ये इराणी नागरिक चक्क मशिदीचे प्रवेशद्वार चाटताना दिसत आहेच . जे करोनाच्या संसर्ग वाढवण्यासाठी पुरेसे आहे.

इराणमध्ये अनेक पुरातन मशिदी आहेत. या प्रत्येक मशिदीचा स्वतंत्र इतिहास आहे. यामुळे जगभरातील सर्वच कट्टरपंथीय इस्लामी बांधवांचे इराणशी नकळत भावनिक नाते जुळलेले आहे. या व्हिडिओमध्येही याच वेड्या भावनेतून लोक आपल्या देशावर आलेले करोनाचे संकंट दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून एका मशिदीचे प्रवेशद्वारावर चाटताना दिसत आहेत. जेणेकरून करोनाचा संसर्ग त्यांना होईल पण दुसऱ्यांना होणार नाही. यात लहान मुलापासून सगळ्याच इराणी नागरिकांनी सहभाग घेतला होता. करोनाची भीती लोकांच्या मनातून घालवण्याचाही यामागचा उद्देश्य असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच या व्हिडीओमध्ये एक धर्मनगुरु करोना वगैरे काही नसते .ज्या देशात तो आहे तिथे मला घेऊन चला असे सांगत लोकांना करोनाच्या जाळ्यात अडकू नका असे धक्कादायक प्रवचन देतानाही दिसत आहे.

 

First Published on: March 27, 2020 10:45 PM
Exit mobile version