Indian Railways : कोरोनानंतर पहिल्यांदाच ट्रेनचे तिकिट बुक करत आहात ? IRCTC चे नवे नियम वाचा

Indian Railways : कोरोनानंतर पहिल्यांदाच ट्रेनचे तिकिट बुक करत आहात ? IRCTC चे नवे नियम वाचा

भारतीय रेल्वेच्या तिकिट सॉफ्टव्हेअरमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट आरक्षित करताना काही नव्या अपडेट्ससह तिकिट बुक करावे लागणार आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग एण्ड टूरिजम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ऑनलाईन तिकिटच्या नियमात बदल केले आहेत. रेल्वे प्रवाशांना आता मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तिकिट बुक करता येणार आहे.

देशभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे या कालावधीत रेल्वेने तिकिट आरक्षणावर बंदी घातली होती. पण आता देशात कोरोनाच्या नियमात शिथिलता आणतानाच अनेक नवीन नियम रेल्वेकडून प्रवाशांसाठी जाहीर करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांना गेल्या अनेक महिन्यांमध्ये रेल्वेचे तिकिट बुक केले नाही, अशा प्रवाशांना या नव्या बदलांना सामोरे जावे लागू शकते. बऱ्याच महिन्यांनंतर तिकिट आरक्षित करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आता आयआरसीटीसरीच्या पोर्टलवर तिकिट खरेदी करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतर तिकिट बुक करता येणार आहे. पण ज्या प्रवाशांनी गेल्या काही महिन्यांमध्ये तिकिट आरक्षित केले आहे, अशा प्रवाशांना मात्र ही प्रक्रिया करावी लागणार नाही.

जाणून घ्या काय आहेत नवे नियम ?

कोरोनाचा कहर थांबल्यानंतर अनेक ठिकाणी ट्रेनची वाहतूक ही नियमित करण्यात आली आहे. अशातच तिकिटांच्या विक्रीतही वाढ करण्यात आली आहे. आयआरसीटीसीच्या दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमणामुळे गेल्या काही दिवसात अनेक अकाऊंट्स निष्क्रिय होते. त्यामुळेच हे अकाऊंट पुन्हा एक्टिव्हेशनसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरीफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कसे कराल व्हेरीफिकेशन ?

जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीच्या पोर्टलवर लॉग इन कराल, तेव्हा व्हेरिफिकेशन विंडो ओपन होईल. त्यानंतर आपला रजिस्टर ईमेल आणि मोबाईल नंबरची नोंद करा. त्यानंतर एडिटिंग आणि वेरिफिकेशनचा पर्याय आहे. वेरिफिकेशनचा पर्याय निवडून तुमच्या नंबरवर एक वन टाईम पासवर्ड मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. त्यानुसारच ईमेल व्हेरिफिकेशनही करावे लागेल. ईमेलही ओटीपीच्या माध्यमातून व्हेरिफाय होईल.

IRCTC च्या माध्यमातून कसे होते तिकिट बुकिंग ?

IRCTC च्या माध्यमातून तिकिट ऑनलाईन बुक करण्याचा पर्याय देते. या पोर्टलवर प्रवाशांना आपला एक आयडी तयार करावा लागतो. त्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईेमेलचा पर्याय द्यावा लागतो. ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशननंतर प्रवाशांना आपले तिकिट बुक करता येते.


 

First Published on: February 14, 2022 2:09 PM
Exit mobile version