‘चांद्रयान २’ नंतर इस्त्रोचे ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह झेपावलं

‘चांद्रयान २’ नंतर इस्त्रोचे ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह झेपावलं

'चांद्रयान २' नंतर इस्त्रोचे 'कार्टोसॅट-३' उपग्रह झेपावलं

‘चांद्रयान २’ नंतर इस्त्रोने पुन्हा एकादा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अवकाश करण्यात आलं आहे. या उपग्रहाचे तब्बल १६२५ किलो एवढं वजन आहे. ‘कार्टोसॅट-३’ चे प्रक्षेपण आंधप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लाँच पॅडहून करण्यात आलं. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रहाच्या मदतीने या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाणं आहे.

‘या’ उपग्रहाचे उपयोग काय?

अवकाशात ‘कार्टोसॅट-३’ हे उपग्रह पाच वर्ष कार्यरत राहणार असून यामध्ये हाय रिझोल्युशनची छायचित्र घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा उपग्रह पृथ्वीचं छायचित्र काढण्यासाठी आणि नकाशा निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसंच मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं आता शक्य होणार आहे. नगर नियोजन, पायभूत सुविधा विकास आणि किनारपट्टी विकासात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

श्रीहरिकोटा येथून हे ७४ वे उड्डाण आहे. ‘कार्टोसॅट-३’ या उपग्रहाच्या मदतीने अधिक सुस्पष्ट असं छायाचित्र घेता येणार आहे. हा उपग्रह ५०९ किमीच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. सहा घन इंधन मोटारी पीएसअलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात आहे. १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन पीएसएलव्ही सी ४७ झेपावले आहे. १३ लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-४ पी’ हे १२ लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. हे सर्व अमेरिकेमध्येच आहे.


हेही वाचा – श्रीनगरमध्ये काश्मीर यूनिव्हर्सिटीबाहेर ग्रेनेड हल्ला


 

First Published on: November 27, 2019 12:16 PM
Exit mobile version