ISRO ची मोठी घोषणा! आता खासगी कंपनी भारतात रॉकेट आणि उपग्रह बनवणार!

ISRO ची मोठी घोषणा! आता खासगी कंपनी भारतात रॉकेट आणि उपग्रह बनवणार!

ISRO ची मोठी घोषणा! आता खासगी कंपनी भारतात रॉकेट आणि उपग्रह बनवणार!

येत्या काही दिवसांत भारतातील अंतरिक्षच्या क्षेत्रातही मोठा बदल होऊ शकतो. भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) असे जाहीर केले की, आता खासगी कंपन्या रॉकेट व उपग्रहदेखील बनवू शकतात. इस्रोचे चेरीमन के. सिवन यांनी सांगितले की, आता अवकाश क्षेत्र (space sector) खासगी कंपन्यांसाठी खुले केले जाईल. यावर्षी नासाने पहिल्यांदाच खासगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून दोन लोकांना इंटरनेशनल स्पेस स्टेशनवर पाठविले आहे.

संशोधन व विकास कामे इस्त्रोकडून राहणार सुरू

इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी गुरुवारी सांगितले की, आता खासगी क्षेत्राला रॉकेट व उपग्रह तयार करणे आणि प्रक्षेपण सेवा पुरविणे यासारख्या अवकाश कामांना परवानगी देण्यात येईल.तसेच, खाजगी क्षेत्रही भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) च्या अंतरग्रहीय मिशनचा भाग बनू शकेल. सिवन यांनी इस्रोचे काम कमी होणार नसल्याचे सांगितले असले तरी संशोधन व विकास कामे इस्त्रोच्या वतीने सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंतराळ संशोधन क्षेत्रात नोकरीची संधी

गेल्या कित्येक वर्षांपासून खासगी कंपन्या इस्रोला कंपोनेंट्स व इतर वस्तू पुरवित आहेत. सिवन म्हणाले, “आता अंतराळ संशोधन क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता असून या व्यतिरिक्त या क्षेत्रात वाढ होण्याचीही चांगली शक्यता आहे. दरम्यान, अमेरिका, चीन आणि युरोपच्या बर्‍याच देशांमध्ये अंतराळ संशोधनात खासगी क्षेत्राचा आधीपासून सहभाग आहे.

मंत्रिमंडळाने दिली मान्यता

बुधवारी मंत्रिमंडळाने अंतराळासंदर्भातील सर्व कामांमध्ये खासगी क्षेत्रातील सहभागास मान्यता दिली होती. ही माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, “यामुळे केवळ या क्षेत्राला गती मिळणार नाही तर भारतीय उद्योग देखील अंतरिक्ष अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतील.” यासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


पावसाचे पाणी तुंबले! सफाईसाठी BJP नगरसेवकाने स्वतः केले ड्रेनेज साफ!
First Published on: June 25, 2020 5:17 PM
Exit mobile version