लोकांचा मार खाण्याच्या भीतीने चोरानेच केला पोलिसांना फोन…

लोकांचा मार खाण्याच्या भीतीने चोरानेच केला पोलिसांना फोन…

चोर नेहमी हळूच येतो, चोरी करतो आणि संधी मिळताच पळून जातो. त्यानंतर लोक पोलिसांकडे चोरीची तक्रार करतात आणि मग पोलिस चोरांचा तपास करण्याचा प्रयत्न करतात. आपण आत्तापर्यंत अशाप्रकारच्याच बातम्या ऐकल्या आहेत. मात्र, यावेळी एक वेगळी घटना समोर आली आहे. जिथे एक चोर स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांना फोन करुन चोरीची कबूली देतो. ही घटना बांग्लादेशमधील आहे.

बांग्लादेशच्या बरिसाल शहरामध्ये बुधवारी सकाळी एका चोराने किरानाच्या दुकानामध्ये चोरी करण्यासाठी गेला होता. याबाबत माहिती देत स्थानीय पोलिसांनी माहिती देत सांगितलं की, 40 वर्षाचा यासीन खान बंद दुकानामध्ये सामान चोरी करण्याच्या हेतूने गेला. मात्र, त्याची चोरी करुन झाल्यानंतर दुकानातून बाहेर पडताना, त्याला कळालं की, आता सकाळ झाली असून बाहेर उजेट पडला आहे आणि सर्व लोक जागे झाले आहेत.

त्यावेळी हळूहळू बाजार भरु लागलेला पाहून तो घाबरला. त्याला वाटलं की, जर तो दुकानाबाहेर पडताना त्याला कोणी पाहिलं तर, लोक त्याला मारतील. त्यामुळे त्यांने घाबरुन स्वतःच पोलिसांना फोन लावला आणि त्याला लोकांच्या मारापासून वाचवायला सांगितलं.

त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं आणि दुकानातून बाहेर काढून पोलिस स्टेशनमध्ये नेलं. या दुकानाच्या मालकाने सांगितलं की, या चोराने एक मोठ्ठी बॅग भरुन सामान चोरी केलं होतं. परंतु तो दुकानाबाहेर पडू शकला नाही. आता त्या चोराला पोलिसांना अटक केली आहे.


हेही वाचा :

मॅक्सिकोमध्ये ऑईल टँकरची धडक; ट्रेन पूर्णपणे जळून खाक

First Published on: October 21, 2022 4:40 PM
Exit mobile version