एअरपोर्टवर सापडली २२ जिवंत काडतुसं

एअरपोर्टवर सापडली २२ जिवंत काडतुसं

शमशाबाद एअरपोर्ट

हैद्राबादमधील एका एअरपोर्टवर एका इटलीच्या नागरिकाला अटक करण्यात आले आहे. इटलीच्या या व्यक्तीकडून २२ जिवंत काडतूसं आणि ३ वापरलेली काडतूसं पोलिसांनी जप्त केले आहे. हैद्राबातच्या शमशाबाद एअरपोर्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या इटलीच्या या नागरिकाचे नाव निकोल संगर्मनो असे सांगितले जात आहे. हैद्राबाद पोलिसाकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.

पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरु

शमशाबाद एअरपोर्टवर प्रवाशांच्या तपासणी दरम्यान एका इटलीच्या नागरिकांला ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीच्या बॅगची तपासणी करण्यात आली असता त्याच्या बॅगेतून २२ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केली तर ३ वापरण्यात आलेलली काडतूस जप्त करण्यात आली. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. त्याला ही काडतूस कुठे मिळाले तो कोणत्या कामासाठी या काडतूसांना सोबत घेऊन आला आहे. यासर्व प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा – 

त्याने पार्श्वभागात लपवलं सोनं; दिल्ली एअरपोर्टवर अटक

First Published on: November 21, 2018 8:50 PM
Exit mobile version