इटली: जादूचं पाणी असणाऱ्या ‘या’ गावात कोरोनाची एण्ट्री झालीच नाही!

इटली: जादूचं पाणी असणाऱ्या ‘या’ गावात कोरोनाची एण्ट्री झालीच नाही!

प्रातिनिधिक फोटो

संपूर्ण जग कोरोनामुळे हतबल झालं आहे. इटली अमेरिकेत कोरोनाने हैदोस घातला असताना आतापर्यंत इटलीमध्ये सर्वाधिक लोकांचा जीव कोरोनाने घेतल्याचे समोर आले आहे. इटलीमध्ये साधारण १२ ते १३ हजार लोकांचा कोरोनाने बळी गेला तर १ लाख ५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरस सर्वाधिक धुमाकूळ घालत असताना असा दावा केला जातोय की, इटलीमध्ये असणारे एक गाव कोरोनापासून पुर्णतः सुरक्षित असून जीवघेणा कोरोना त्या गावात शिरकावच करू शकला नाही. इटलीच्या पूर्वेकडील भागात असणाऱ्या पियोदमॉन्टमध्ये स्थित असणाऱ्या तुरीन शहराच्या गावाचे नाव आहे ‘मोंटाल्दो तोरीनीज’ (Montaldo Torinese).

जादूच्या पाण्यामुळे कोरोनाची एकही केस नाही

या ठिकाणी राहणाऱ्या लोकांकडून असे दावा केला जातोय की, ‘मोंटाल्दो तोरीनीज’मध्ये असणाऱ्या जादूच्या पाण्यामुळे कोरोना व्हायरसने बाधित झाल्याची एकही घटना घडली नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार या पाण्यामुळे नेपोलियन बोनापार्टच्या सैनिकांचा न्यूमोनियाही बरा झाला होता. मोंटाल्दो तोरीनीज हे गाव तुरीनपासून साधारण १९ किमी दूर आहे. शनिवारी तुरीनमध्ये कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ३ हजार ६८५ इतकी होती तर पियोदमॉन्ट (Piedmont) या भागात कोरोनाचा तीव्र फटका बसला.

असे म्हटले जाते की, मोंटाल्दो तोरीनीजमध्ये असणाऱ्या विहिरीतील जादुच्या पाण्यामुळे नेपोलियनची सैन्य परत मिळवण्यासाठी खूप मोठी मदत झाली. पियोदमॉन्ट शहराचे महापौर सर्गेई गियोत्ती (Sergio Gaiotti) यांनी सांगितले की, ‘इथे असणारी हवा खूप शुद्ध आहे तसेच हे पाणी खरंच जादूचं पाणी असावं. त्यामुळे हे सर्व शक्य आहे.’

‘मोंटाल्दो तोरीनीजमधून अनेक लोक तुरीन या ठिकाणी जातात, जेथे कोरोना व्हायरसची महामारी पसरली आहे. परंतू, स्वच्छ हवा आणि निरोगी जीवनशैलीमुळे कोरोना येथे पसरू शकला नाही. मात्र असे असले तरी या गावात लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. इटलीतील ते पहिले गाव असेल ज्याठिकाणी कोरोना नसताना देखील खबरदारी म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले आहे.


चीनला अखेर उपरती; शेन्झेनमध्ये वन्यजीव खाण्यावर बंदी लागू!
First Published on: April 2, 2020 11:52 AM
Exit mobile version