आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची उपस्थिती

आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची उपस्थिती

जगन्नाथ रथ यात्रा आजपासून सुरू होणार आहे. ही १ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत चालू असेल.

प्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रा आजपासून सुरू होणार आहे. ही १ जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत चालू असेल. हिंदू दिनर्दशिकेनुसार प्रत्येक वर्षाच्या आषाढ शुक्ल द्वितीया तिथीला जगन्नाथ यात्रेचा प्रारंभ होतो. ही यात्रा एकूण ९ दिवसांची असते. ज्यामध्ये ७ दिवस भगवान जग्गनाथ आपला भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रासोबत गुंडिचा मंदिरात निवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, गुंडिचा येथे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे. त्यामुळे पौराणिक परंपरेनुसार रथ यात्रेच्या पहिल्या दिवशी या तीन रथांना गुंडिया मंदिरात नेले जाते. तसेच या रथांना मोठ्या दोरीने खेचले जाते.

जगन्नाथ यात्रेचा कार्यक्रम
जगन्नाथ मंदिर पुरीचे गजपति दिव्यसिंह देव, दुपारी २:३० वाजता भगवान जगन्नाथांचा रथ नंदीघोष, बलरामचा रथ तालध्वज आणि सुभद्रा देवीचा रथ दर्पदलनवर छेरा पहरा ही एक विधी करतील. ही विधी १ जुलै दुपारी २:३० वाजल्यापासून ते ३: ३० पर्यंत चालू असेल. त्यानंतर या विशाल रथांना लाकडाचे घोडे लावले जातील.

रथ यात्रेचा शुभारंभ
१ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता जगन्नाथ यात्रा चालू होईल. भक्त ३ किमी पर्यंत या रथांना खेचून घेऊन जातील. यामध्ये सर्वात पुढे बलरामांचा रथ तालध्वज असेल, त्यानंतर सुभद्रा देवीचा रथ दर्पदलन असेल आणि त्यानंतर भगवान जगन्नाथ यांचा रथ नंदीघोष असेल.गुंडीचा मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ , बलराम आणि सुभद्रा देवी ९ जुलै पर्यंत राहणार आणि त्याच दिवशी पुन्हा प्रस्थान करतील.

जगन्नाथ रथ यात्रा साजरी करण्यामागे हे आहे कारण
भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेला भारतात साजरा केल्या जाणाऱ्या धार्मिक महामहोत्सवातील सगळ्यात प्रमुख मानले जाते. ही यात्रा भारतात अनेक वर्षांपासून साजरी केली जाते. या रथाबाबत अशी मान्यता आहे की, एके दिवशी सुभद्रा देवी आपले भाऊ कृष्ण आणि बलराम यांच्याकडे संपूर्ण नगर पाहण्याची इच्छा दर्शवतात. तेव्हा आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण आणि बलराम एक भव्य रथ तयार करतात आणि त्यात बसून ते तिघे नगर फिरतात. यामुळेच प्रत्येक वर्षी जगन्नाथ यात्रा साजरी केली जाते.

First Published on: July 1, 2022 11:21 AM
Exit mobile version