प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला खून

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला खून

Workman dies of electric shock

राजस्थान येथील बगरु येथे पतीचा लूटमारीत मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाच दिवसांनंतर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला असून प्रेमात अडथळा ठरत असल्याने प्रियकरच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रियकराने बेदम मारहाण करत खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थान मधील बगरु येथे राहणारे सुरेश चंद्र यांचे काही वर्षांपूर्वी कुसुम शर्मा हिच्याशी लग्न झाले होते. दरम्यान, सुरेश चंद्र यांची पत्नी कुसुम शर्मा हिचे लग्नाच्या आधीपासून चंद महावर या व्यक्तीवर प्रेम होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात दूरावा निर्माण झाला. त्यानंतर कुसुमने सुरेश चंद्रशी लग्न केले. काही वर्ष चांगली गेली. दरम्यान, २०१८ मध्ये कुसुमचा फेसबुकद्वारे चंद महावरशी पुन्हा संपर्क आला. त्यानंतर त्यांच्यात सातत्याने फोनद्वारे बोलणे सुरु झाले. नंतर ते एकमेकांना भेटायला लागले आणि पुन्हा त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. यामध्ये कुसुमचा पती सुरेश चंद्र याचा त्यांना प्रेमात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी सुरेशचा काटा काढायचे ठरवले.

दरम्यान, सुरुवातीला कुसुम आणि तिच्या प्रियकरांनी युट्यूब आणि हॅलो अॅपवर खून कसा करायचा हे उपाय शोधण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना शक्य झाले नाही. तसेच त्यांचे भेटणे आणि बोलणेही कठिण झाले. नंतर कुसुमने प्रियकराला व्हॉट्अॅपद्वारे व्हिडीओ कॉल करुन त्यांनी प्लॅन रचला.

मिळालेल्या माहितीनुसार; प्लॅन केल्यानंतर दोघांनीही आपल्या मोबाईलमधील फोटो आणि कॉल रेकोर्ड डिलिट केले. नंतर कुसुमने पती सुरेशचा परिसर ट्रॅक केला. नंतर तिच्या प्रियकरांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पेट्रोल पंपच्या ठिकाणी या असे सांगून बोलावून घेतले. नंतर त्याला बेदम मारहाण करुन त्याच्याजवळील पैशाचे पाकिट, मोबाईल, सोन्याची अंगठी घेऊन चंद महावर पसार झाला. यामध्ये सुरेशचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी कुसुमने घर मालकाला बोलावून आपला पती हरवल्याची तक्रार दाखल केली.

आरोपीला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चंद महावर याला दुसऱ्याच दिवशी अटक केली. सुरुवातीलाच पोलिसांचा सुरेशच्या पत्नीवर संशय होता. त्यांनी तिची चौकशी केली असता. दोघांनी मिळून हे कृत्य केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – केरळमधील १०० सदस्यांचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल


 

First Published on: June 1, 2020 10:51 AM
Exit mobile version