हवाई प्रवाशांमध्ये होतेय चिडचिड, यासाठी डीजीसीएने उचलले महत्त्वाचे पाऊल

हवाई प्रवाशांमध्ये होतेय चिडचिड, यासाठी डीजीसीएने उचलले महत्त्वाचे पाऊल

हवाई प्रवाशांमध्ये होतेय चिडचिड, यासाठी डीजीसीएने उचलले महत्त्वाचे पाऊल

कोरोना संकटाच्या अगोदर आणि कोरोना संकटाच्या दरम्यान हवाई प्रवासात खूप बदल झाले आहेत. पहिले हवाई प्रवासी विना मास्क, विना हातमोजे आणि विना फेस शील्ड शिवाय प्रवास करत होते. पण या कोरोनामुळे प्रवाशांना मास्क, हातमोजे, फेस शील्ड घालून प्रवास करणे बंधनकारक आहे. यामुळे प्रवाशांमध्ये चिडचिडेपणा होत आहे. हे लक्षात घेऊन डीजीसीए एअरलाईन्स कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीने प्रवाशांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याबाबत विचार करीत आहेत.

एअरपोर्ट सूत्रांच्या माहितीनुसार, मिशन वंदे भारत अभियाना अंतर्गत येणाऱ्या फ्लाईट्स आणि देशांतर्गत फाईट्समधील एअरलाईन्स कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटना समोर येत आहेत. ८ ते १० तासांच्या परदेशी प्रवासादरम्यान विना व्हेंटिलेशनमध्ये प्रवाशांच्या चेहऱ्यावर मास्क, फेस शील्ड आणि हातमोजे असतात. काही जण पीपीई कीट घालून प्रवास करतात. म्हणून सध्या प्रवाशांच्या वागण्यात चिडचिडेपणा दिसून येत आहे.

जयपूर विमानतळ संचालक जे.एस.बलहार म्हणाले की, अशा परिस्थितीत अनेक प्रवाशी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि यामुळे एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांशी किंवा केबिन क्रूबरोबर वाद करतात. अशा परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी डीजीसीए एअरलाईन्स प्रवाशांशी कसा व्यवहार करायचा याबाबत नवीन प्रशिक्षण देण्याचा विचार करीत आहे. जेणेकरून कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये समन्वय साधता येईल. सध्या जयपूर विमानतळावर आतापर्यंत एअरपोर्ट अथॉरिटीकडे अशा प्रकारची तक्रार आलेली नाही आहे.

हवाई प्रवासी गुदमरल्यामुळे किंवा श्वसनाच्या समस्यामुळे प्रवासात मास्क घालण्यास नकार देऊ शकतात. वैद्यकीय तपासणीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे प्रवाशांना वैताग येऊ शकतो. कोरोना भीतीमुळे देखील प्रवाशांचे वर्तन असमान्य असू शकते. याच पार्श्वभूमीवर पुढे जे.एस बलहार म्हणाले की, अशा परिस्थिती एअरलाईन्स केबिन-क्रूला माहिती पाहिजे की अशा समस्या येऊ शकतात. तसेच यामुळेच एअरलाईन्स कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ शकता. अशी परिस्थिती हातळण्यासाठी डीजीसीए हे पाऊल उचलत आहे. या नव्या प्रशिक्षणामुळे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये समन्वय निर्माण झाला तर कोरोनाचा काळात प्रवास आनंनदायी होऊ शकतो.

First Published on: July 7, 2020 7:20 PM
Exit mobile version