नमाजच्या नावाखाली नियमांचं उल्लंघन करणं ‘हराम’ – मौलाना महमूद मदानी

नमाजच्या नावाखाली नियमांचं उल्लंघन करणं ‘हराम’ – मौलाना महमूद मदानी

प्रातिनिधीक फोटो

जमीअत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना महमूद मदानी यांनी तबलीग जमात मरकज मेळाव्याला खेदजनक म्हटलं आहे. जे काही घडलं ते दु:खद आणि गुन्हा आहे, असं माझं मत आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. जमीअत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना महमूद मदानी यांनी धर्म किंवा नमाजच्या नावाखाली सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे उल्लंघन आणि लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍यांचा निषेध केला आहे. कोरोना विषाणू यापुढे पसरू नये यासाठी भारतीय मुस्लिम एकत्र आले आहेत. भारतात लाखो मशिदी आहेत, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशांचे पालन करणारे काही मोजकेच आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय मुस्लिम देशाबरोबर शंभर टक्के आहेत, असं मौलाना मदानी म्हणाले. तबलीग जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्या कथित ऑडिओमध्ये त्यांनी असं भाष्य केलं आहे की, “सामाजिक अंतराचे अनुसरण करण्याची आवश्यकता नाही किंवा कोरोना विषाणू हा मुस्लिमांना त्यांच्या धर्माचे पालन करण्यापासून रोखण्याचा डाव होता.” यावर मौलाना महमूद मदानी यांनी म्हटलं की, “हे जर त्यांनी म्हटलं असेल तर ते चूक आहे, गुन्हा आहे.”


हेही वाचा- Coronavirus: इराणच्या सभापतींना कोरोनाची लागण


तथापि, जमीअत उलेमा-ए-हिंद प्रमुख यांनी सरकार आणि अधिकारी यांना ताबलीग जमात मरकजच्या उपस्थितीत असलेले अणि संयोजकांना गुन्हेगार ठरवा असं म्हटलं आहे. “हे प्रकरण मानवजातीच्या दृष्टीने सोडवलं गेलं पाहिजे, राग किंवा टोकाचे उपाय किंवा सूडबुद्धीने नव्हे. सरकारने जमातमधील सदस्यांना पुढे येण्यास आणि वैद्यकीय सेवेसाठी सरकारांनी आता कृती करणे आवश्यक आहे. शिक्षा किंवा गुन्हेगारी कार्यपद्धतीचं अनुसरण नंतर करा, असं मौलाना मदिनी म्हणाले.

मौलानांनी संपूर्ण भारतभर प्रवास केलेल्या मरकजमधील उपस्थितांना लपून बसू नका बाहेर या आणि अधिकाऱ्यांनी त्यांची काळजी घ्यावी असे आवाहन केले. लुन बसू नका त्यामुळे आपल्या प्रियजनांचा धोक्यात घालत आहात, असं मौलाना मदिनी म्हणाले.

 

First Published on: April 3, 2020 9:00 AM
Exit mobile version