जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान गनी ठार

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान गनी ठार

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान गनी ठार झाला. इम्रान गनी हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हायब्रीड दहशतवादी होता. (jammu and kashmir hybrid terrorist killed attacked laborers with granade in shopian)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी इम्रान बशीर गनी हा जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकत होता. याप्रकरणी सुरक्षादलानी केलेल्या कारवाईत इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते. त्यानंतर गनीने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. या छापेमारीवेळी शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इम्रान गनीचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 2 मजूर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात ठार झालेले दोघेही राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील रहिवासी होते. याबाबत काश्मीर पोलिसांनी मंगळवारी ट्विट करत माहिती दिली होती.

काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, ‘दहशतवाद्यांनी हरमन येथे ग्रेनेड फेकले, ज्यात उत्तर प्रदेशचे 2 मजूर मनीष कुमार आणि राम सागर जखमी झाले. रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. दोघेही कन्नौजचे रहिवासी होते. यावेळी परिसराची नाकेबंदी करण्यात आली. शोपियान पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव इम्रान बशीर गनी असून तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हायब्रीड दहशतवादी आहे’, असे सांगितले.


हेही वाचा – मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या धमकीचा फोन, पोलिसांकडून तपास सुरू

First Published on: October 19, 2022 7:06 PM
Exit mobile version