शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारापूर्वी मुलीचा जन्म; लष्करात पाठवण्याची आईची इच्छा

शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारापूर्वी मुलीचा जन्म; लष्करात पाठवण्याची आईची इच्छा

शहीद जवान रणजितसिंह

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि जवानांमध्ये शनिवार चकमक झाली. या चकमकीमध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले. यामधील शहीद झालेल्या लांस नायक रणजितसिंह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी पैतृक येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या काही तासापूर्वीच त्यांची पत्नी शिमूदेवी यांची प्रसूती झाली आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. रणजिंतसिंह यांची पत्नी शिमूदेवी या बाळाला घेऊन शहीद पतीला अंतिम निरोप देण्यासाठी आल्या.

१० वर्षानंतर अपत्यप्राप्ती

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३६ वर्षाच्या रणजितसिंह यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. मात्र काही कारणाने त्यांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार मंगळवारी करण्यात येणार असा निर्णय घेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री रणजितसिंह यांच्या पत्नीला प्रसुतिवेदना होऊ लागल्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिमूदेवीने आज पहाटे चिमुकलीला जन्म दिला. रणजितसिंह शहीद झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तर दुसरीकडे दहा वर्षानंतर कुटुंबामध्ये अपत्यप्राप्ती झाली होती.

चिमुकलीला घेऊन अंत्यसंस्कारासाठी

पहाटेच चिमुकलीचा जन्म झाला होता. शहीद पतीच्या अंत्यसंस्कारासाठी शिमूदेवी बाळाला घेऊन अॅम्ब्युलन्सद्वारे स्मशानात पोहचली. पत्नी आणि मुलीने रणजिंतसिंह यांना अखेरचा निरोप दिला. २००३ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. पत्नी शिमूदेवीच्या देखभालीसाठी रणजितसिंह सुट्टी घेणार होते. मात्र त्यापूर्वीच ते शहीद झाले.

शहीद जवानाच्या पत्नीचा धाडसी निर्णय

शिमूदेवीने पतीच्या मृत्यूनंतर एक धाडसी निर्णय घेतला आहे. ‘माझी इच्छा आहे की, माझी मुलीने सुध्दा आर्मी जॉइन करावे आणि आपल्या वडीलांसारखी देशाची सेवा करावी.’

First Published on: October 23, 2018 10:22 PM
Exit mobile version