सोपोरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सोपोरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर सध्या या परिसरातील इंटरनेट सेवा वंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरात सध्या इंटरनेट सेवा बंद केली असून या परिसरात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. ब्राथ कला परिसरात बुधवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कर, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहिम राबवण्यात आली होती.

First Published on: December 13, 2018 10:38 AM
Exit mobile version