भारतीय जवानांचा लष्कर- ए- तोयबाला मोठा झटका; दहशतवादी अबू हंजलाला अटक

भारतीय जवानांचा लष्कर- ए- तोयबाला मोठा झटका; दहशतवादी अबू हंजलाला अटक

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरमध्ये भारतीय जवानांनी लष्कर- ए- तोयबाला मोठा झटका दिला आहे. लष्कराचं छुप्यापद्धतीने नेटवर्क तयार करणारा रिक्रुटिंग कमांडर अबू हंजला याला सुरक्षा दलाने अटक केली आहे. अबू हंजला हा जम्मू काश्मीरमधील लष्कराचा कमांडर बाबर भाईच्या सतत संपर्कात होता. त्याच्या मागावर लष्कराते पोस्टर्स, जिहादी साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा साठाही सापडला आहे. पोलिस, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.

अबू हंजला हा बांदीपोर जिल्ह्यातील स्केबाला हाजीनता रहिवासी असून त्याचे खरे नाव मेहराजुद्दीन राथेर आहे. दरम्यान
पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टास्क फोर्सने चंदरगीर हाजीन येथे केलेल्या विशेष कारवाईदरम्यान त्याला अटक केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंदेरगीरमध्ये एका वाहनांमधील लोकांची तपासणी केली जात होती तेव्हा हंजला घाबरला आणि त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैनिकांनी त्यावला थांबवले आणि विचारपूस केली, मात्र तो एकाही प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकला नाही.

यावेळी घटनास्थळी जवानांनी त्याच्या सामानाची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक हँड ग्रेनेड आणि असॉल्ट रायफलची तीन काडतुसे सापडली. त्याचवेळी त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीदरम्यान अबू हंजला हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याचे उघड झाले, हजंला हा गेल्या काही काळापूर्वी बांदीपोरा येथील दहशतवादी संघटनेत स्थानिक मुलांची भरती करत होता. बांदीपोरामधील विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये त्याच्या ओव्हरग्राउंड वर्कर नेटवर्कद्वारे, तो जिहादी मानसिकतेच्या मुलांची ओळख करून त्यांना लष्करात भरतीसाठी तयार करण्यात गुंतला होता.


अमेरिकेच्या मॅनहॅटनमधील उंच इमारतीला भीषण आग; 38 जण होरपळले, दोघांची प्रकृती गंभीर

First Published on: November 6, 2022 11:04 AM
Exit mobile version