राज्यात जनता दल ५ जागांवर लढणार

राज्यात जनता दल ५ जागांवर लढणार

एच डी देवेगौडा

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युती-आघाडीच्या जागा जवळपास निश्चित झाल्यापासून, या निवडणुकीच्या रिंगणात जनता दल (सेक्युलर) देखील उतरणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाच जागावर आपला उमेदरवार उभे करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जनता दल औरंगाबाद, सांगली, पालघर, नांदेड आणि शिरूर या जागांवर निवडणूक लढवणार असून औरंगाबाद आणि सांगलीमध्ये जनता दलाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

औरंगाबादमधून कोळसे-पाटील

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जनता दलने औरंगाबादमधून न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव निश्चित केले असून, सांगलीमध्ये शरद पाटील यांना देखील रिंगणात उतरवणार आहे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील मागील काही दिवसांपासून भाजपा आणि संघावर जोरदार टीका करत आहे. त्यामुळेच त्यांना पक्षाने औरंगाबादमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह केल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये सध्या शिवसेनेचा खासदार असून, शिवसेनेला सुरुंग लावण्यासाठी जनता दल या मतदार संघातून आपला उमेदवार देत आहे. तर पालघरमध्ये काळूराम दोधडे यांनी पाठिंबा दिल्याने ही जागा देखील जनता दल लढणार आहे.

आम्ही राज्यात पाच जागांवर लढणार असून, औरंगाबादमध्ये ताकतीने लढणार आहोत. वंचित आघाडीने कोळसे पाटलांना पाठींबा जाहीर केला आहे. तसेच डाव्या आणि दलित कार्यकर्त्यांमध्ये कोळसे पाटलांची क्रेझ आहे.
– प्रभाकर नारकर, मुंबई अध्यक्ष, जनता दल सेक्युलर

आघाडीसह वंचित आघाडीसोबतही चर्चा

जनता दलची काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचीत आघाडीसोबत देखील चर्चा सुरू असून, स्वतः देवेगौडा काँग्रेसच्या वरिष्ठांसोबत बोलत असल्याचे जनता दलचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी आपलं म्हणगरशी बोलताना सागितले. जर भाजपा आणि शिवसेनेला घालवायचे असेल तर काँग्रेसने मोठे मन करून जनता दलला सोबत घेतले पाहिजे असे देखील नारकर यावेळी म्हणालेत.

First Published on: February 20, 2019 7:53 PM
Exit mobile version