छेडछाड झालेल्या ‘त्या’ जपानी तरुणीने भारत सोडला, DCW अध्यक्ष म्हणाल्या…

छेडछाड झालेल्या ‘त्या’ जपानी तरुणीने भारत सोडला, DCW अध्यक्ष म्हणाल्या…

दिल्लीत होळीच्या दिवशी जपानी मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन मुलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपली चूक मान्य केली आहे. दिल्लीमधील पहाडगंज येथे राहणारी जपानी तरुणी अखेर भारत सोडून बांगलादेशात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी असेही सांगितले की, त्यांनी जपानी दूतावासाला पत्र लिहून मुलीची ओळख पटवण्यासाठी मदत मागितली होती, परंतु दूतावासाने सांगितले की त्यांना अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही. उपपोलीस आयुक्त संजय कुमार सैन यांनी सांगितले की, व्हिडीओचे विश्लेषण करून योग्य माहिती मिळवली जात आहे.

देशाची राजधानी दिल्लीत देशभरता शरमेने मान खाली घालायला लावणारी अशी एक घटना घडली आहे. जपानहून भारतात भेट देण्यासाठी आलेल्या तरुणीशी होळीच्या दिवशी काही बदमाशांनी गैरवर्तन तर केलेच, पण बळजबरीने तिला रंगही लावत होते. एका तरुणाने तर या तरुणीच्या डोक्यात अंडीही फोडली. ही तरुणी त्या सगळ्यांना विरोध करत राहिली, पण तिचं कोणीही ऐकलं नाही. मुलगी तिथून निघून जाऊ लागताच एका तरूणाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत मुलीने त्याला कानशिलात मारली. शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांना पडला.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीनासह चार आरोपींना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मुलगी पहिल्यांदा होळी खेळण्यासाठी जपानहून भारतात आली होती. या घटनेचा व्हिडीओ मुलीने स्वतः शेअर केला होता, मात्र नंतर तो अकाऊंटवरून काढून टाकण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

मुलीने या घटनेबाबत कोणतीही तक्रार दिली नाही आणि भारतातून बांगलादेशला निघून गेली. मुलीने ट्विट करत ती बांगलादेशात पोहोचली आहे आणि ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे.


दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून या घटनेवर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “जेव्हाही मी हा व्हिडीओ पाहते तेव्हा माझें रक्त उसळतं. काहीही झाले तरी मी त्यांच्यापैकी कोणालाही सोडणार नाही, यातील प्रत्येकजण तुरुंगात जाईल याची काळजी घेऊ.”

First Published on: March 11, 2023 3:39 PM
Exit mobile version