पालकांनो फिकीर नॉट, स्मार्ट शूज ठेवणार मुलांवर वॉच

पालकांनो फिकीर नॉट, स्मार्ट शूज ठेवणार मुलांवर वॉच

भारतात आता मिळणार Xiaomi Mi Men's Sport शूज

मुलं कुठे जातात कोणाला भेटतात दिवसभर काय करतात अशी चिंता विशेषत नोकरी करणाऱ्या पालकांना सतावत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण झारखंडमधील कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या सीतेश्वर राय या व्यक्तीने असे स्मार्ट शूज तयार केले आहेत जे तुमच्या मुलांच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवणार आहेत. या शूजमध्ये बसवण्यात आलेल्या जीपीएसमुळे लांबूनही मुलावंर लक्ष ठेवणे पालकांना शक्य होणार आहे.

झारखंडमधील भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) या कंपनीच्या कोळसा खाणीत सी तेश्वर राय काम करतात. कामाच्या व्यापामुळे त्यांना त्यांच्या १३ वर्षाच्या मुलाला वेळ देता येत नव्हता. मुलावर लक्ष ठेवता येत नव्हते. यामुळे त्यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी मुलाच्या शूजमध्ये डिवाईस फिट करण्याचे ठरवले. सीतेश्वर यांना इंजिनियक व्हायचे होते. पण आर्थिक परिस्थीतीमुळे त्यांचे ते स्वप्न अपूर्ण राहीले होते. पण तरीही ते सतत काहीतरी नवीन डिवाईस बनवण्याचा प्रयत्न करत. यातूनच त्यांनी मुलाच्या शूजमध्ये जीपीएस लावला. त्याला त्यांनी स्मार्ट शूज असे नाव दिले. मुलगा ते शूज घालून बाहेर गेला. तो कुठे गेला. हे सीतेश्वर यांना घरबसल्या कळाले. त्यानंतर त्यांनी स्मार्ट शूज बनवल्याचे इतरांना सांगितले.

स्मार्ट शूजमधील डिवाईस काम कसे करते?

या शूजमध्ये लावण्यात आलेल्या उपकरणामध्ये मोबाईल रिसिव्हर , जीपीएस पॉईंट, ३.५ वॉल्ट बॉटरी, मायक्रोफोन व मोबाईल सिमचा वापर करण्यात आला आहे. मुलगा शूज घालून बाहेर गेल्यानंतर तो नक्की कुठे गेला हे जाणून घेण्यासाठी तुम्ही त्या सिम नंबरवर कॉल करायचा. तुम्ही कॉल केला तरी शूजमधील डिवाईसवर त्याची बेल वाजत नाही. पण मोबाईल रिसिव्हर माध्यमातून तो क्रमांक थेट तुमच्या मोबाईल क्रमांकाबरोबर जुळतो. जीपीएसमधून मुलगा कुठे आहे ते कळते. २० फूटाच्या अंतरापर्यंत हे डिवाईस काम करते. यात मुलगा ज्या ठिकाणी असेल त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील आवाजही तुम्हांला मोबाईलवर ऐकू येतो. या डिवाईसची बॅटरी १७ दिवसातून एकदा चार्ज करावी लागते.

First Published on: March 9, 2020 3:05 PM
Exit mobile version