राज्यसभेत जया बच्चन यांचा राग अनावर; उपराष्ट्रपतींना दाखवले बोट

राज्यसभेत जया बच्चन यांचा राग अनावर; उपराष्ट्रपतींना दाखवले बोट

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या रागामुळे चर्चेत असतात. कधी पापाराझींवर तर कधी त्यांच्याच चाहत्यांवर त्या रागवताना दिसून येतात. त्यामुळे बहुतेक लोकांना त्यांचे वागणे आवडत नाही. अनेकदा जया बच्चन यांना त्यांच्या रागामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील केले गेले आहे. जया बच्चन यांच्या रागाचा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन या चक्क देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना बोट दाखवून काही तरी बोलताना दिसून येत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ 9 फेब्रुवारीच्या राज्यसभेच्या कामकाजाचा असल्याचे बोलले जात आहे.

समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांच्या या वागणुकीमुळे ट्विटरच्या माध्यमातून लोकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ 9 फेब्रुवारीच्या राज्यसभेच्या कामकाजाचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी प्रकरणावरून संसदेत गदारोळ सुरू असतानाच, काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना सभापतींच्या सूचनेचे उल्लंघन केल्याबद्दल चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. यावेळी जया बच्चन या काँग्रेस खासदाराच्या समर्थनार्थ बोलल्या. तसेच त्यांना त्यांचे स्पष्टीकरण मांडण्याची संधीही देण्यात आली नाही, असे सांगितले. याचदरम्यान जया बच्चन या राज्यसभेच्या सभापतींकडे बोट दाखवून अधिवेशनातून बाहेर पडताना दिसत आहेत.

सदर क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोकांनी जया बच्चन यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. कमेंट करून एका ट्विटर यूजरने जया बच्चन यांना अहंकारी म्हटले आणि जया बच्चन नेहमी का रागावतात असे लिहिले. दुसर्‍या नेटकऱ्याने ट्विट करत लिहिले आहे की, ‘जया बच्चन यांनी पुन्हा अहंकार दाखवला आणि संसदेत मर्यादा ओलांडली.’

हेही वाचा – बंजारा बोर्डासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

दरम्यान, सोशल मीडियावर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. याआधी देखील जया बच्चन रागावल्या असल्याचे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. त्यांच्या या रागिष्ट स्वभावामुळे कायमच प्रसार माध्यमे देखील त्यांच्यापासून दूर राहिल्याचे दिसून आले आहे.

First Published on: February 12, 2023 4:37 PM
Exit mobile version