जेटचे २६ हजार कर्मचारी निवडणुकीवर बहिष्कार घालणार

जेटचे २६ हजार कर्मचारी निवडणुकीवर बहिष्कार घालणार

जेट एअरवेज

बँकांकडून सुमारे ९०० कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे झाली आहे. त्यामुळे जेटच्या सुमारे २६ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे जेट एअरवेज कर्मचार्‍यांनी ऑफिसबाहेर ठिय्या धरला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे. तसेच सरकारने तातडीने मदत करावी, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे.

बुधवारी मध्यरात्रीपासून जेटची विमान सेवा बंद झाली. गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्यामुळे कंपनीचे कर्मचारी अगोदरच बेजार झाले होते. त्यात अचानक कंपनी बंद झाल्यामुळे कर्मचारी चिंतेत पडले आहेत. गुरुवारी जेट एअरवेज ऑफिसर्स आणि स्टाफ असोसिएशनची सुरू होती. मात्र, बैठकीनंतर अधिकार्‍यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार कर्मचार्‍यांनी व्यक्त केला होता. मात्र या बैठकीत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी आपले ठिय्या आंदोलन कायम ठेवले आहे. सरकारने दोन कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. आम्ही देशात निवडणूक सुरु असतानाच बेरोजगार होतोय. त्यामुळे निवडणुकीवरही बहिष्कार घालण्याची भावना कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.

बँकांकडून ९०० कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतु काल रात्रीपासून आपली सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला.

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे ९०० कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने काल रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद होणार करण्यात आली.

First Published on: April 19, 2019 8:56 AM
Exit mobile version