जेट एअरवेजचा ‘तो’ निर्णय मागे

जेट एअरवेजचा ‘तो’ निर्णय मागे

प्रातिनिधिक फोटो

गेले काही दिवस जेट एअरवेजच्या बाबतीत उलटसुलट बातम्या येत आहेत. जेट एअरवेजनं दोन दिवसापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगार कपातीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र त्यानंतर पायलट आणि इंजिनिअर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा जोरदार विरोध केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्तीय आपत्तीच्या कारणामुळं जेट एअरवेजनं पगारामध्ये कपात केली होती आणि लगेचच हा निर्णय लागू करण्याचा आदेश दिला होता. मात्र आता एअरलाईनचे सीईओ विनय दुबेची कर्मचाऱ्यांच्या समूहाबरोबर झालेल्या बैठकीत आता हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता पुन्हा जेट एअरवेजचं भवितव्य नक्की काय? यावर चर्चा सुरु होतील.

किंगफिशरपेक्षाही अधिक कर्ज

सध्या कर्जात डुबलेल्या जेट एअरवेजची स्थिती अजिबात चांगली नाही. कंपनीला आपल्या कर्माचारी, पायलटना देण्यासाठी पगार नाहीत. तर नुकतीच पगारामध्ये कपातही करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार यातून कंपनी लवकरच बाहेर पडेल. मात्र बँकांच्या माहितीनुसार, जेट एअरवेज कर्जात बुडाली आहे. त्यावेळी किंगफिशरला देण्यात आलेल्या कर्जापेक्षाही जेट एअरवेजच्या कर्जाची रक्कम जास्त असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. ८१५० कोटी रुपयांच्या कर्जात सध्या ही कंपनी आहे.

जेट एअरवेज बंद होण्याची शक्यता?

गेल्या बऱ्याच दिवसांपासून जेट एअरवेज कंपनी चर्चेत आहे. आता ही कंपनी बंद होणार अशी शक्यता निर्माण असल्याचा वावड्या उठत आहेत. कंपनीची वित्तीय स्थिती चांगली नसल्याची माहिती समोर आली आहे. बँकांनुसार, जेट एअरवेजची स्थिती नीट नाही. बँकेचं कर्ज चुकते करण्याइतके पैसेही सध्या कंपनीकडे नाहीत. तर सध्या कर्ज इतकं वाढलं आहे की, कोणत्याही बँका कर्ज देण्यासाठी तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालायनंही या संबंधी बँकांकडून तपशील मागवले आहेत. जेट एअरवेजची स्थिती किंगफिशर एअरलाईनसारखीच होणार नाही ना? याची दाट शक्यता निर्माण झाली आहे असं म्हटलं जात होतं.

First Published on: August 7, 2018 10:18 AM
Exit mobile version