कोरोना ठरला लकी! त्याच्या भितीमुळे २० वर्षानंतर पळून गेलेला नवरा परत आला!

कोरोना ठरला लकी! त्याच्या भितीमुळे २० वर्षानंतर पळून गेलेला नवरा परत आला!

देशात कोरोनाची लाट आली आणि कोरोनाने नाती दुरावली असं म्हटलं जाऊ लागली. कारण अशी अनेक घटना घडल्या ज्यामध्ये रक्ताच्या नात्याने कोरोनाला महत्त्व देत माणसाला दूर केलं. कोणी वडिलांच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी लावली तर कोणी कोरोना झालेल्या आईला जंगलात सोडून आलं. पण या सगळ्यात झारखंडमधील धनबाद येथील कुटुंबासाठी मात्र कोरोना लकी ठरला असच म्हणावं लागेल. कौटुंबिक वादामुळे २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेली एक व्यक्ती कोरोनाच्या साथीमुळे पुन्हा घरी आली आहे.

झारखंडमधील धनबाद येथील झरियामध्ये हा प्रकार समोर आला आहे. सत्य नारायण यादव यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी घर सोडलं होतं. नुकताच ते वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा घरी आले आहेत. सन २००० साली एका कौटुंबिक वादानंतर रागाच्याभरात सत्य नारायण घरातून निघून गेले होते. ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन भाड्याच्या घरात राहत होते. मात्र सत्य नारायण नक्की कुठे आहे याबद्दल कुटुंबातील कोणाला काहीच माहिती नव्हती. सत्य नारायण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती मात्र सत्य नारायण यांचा पत्ता लागला नव्हता. आता तब्बल २० वर्षानंतर सत्य नारायण घरी परतल्याने कुटुंबीय सध्या आनंदी आहेत.

सत्य नारायण यांनी पैसे कमवण्यासाठी वजन करण्याचं मशीन विकत घेऊन रस्त्याच्याकडेला बसू लागले. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणी वजन केलं तर सत्य नारायण यांना दिवसाला काही रुपये मिळायचे. मात्र मागील आठवड्यामध्ये सत्य नारायण यांची प्रकृती खूपच खालावली. ताप, सर्दी आणि खोकला असल्याने सत्य नारायण घरीच पडून होते. सत्य नारायणला होत असणारा त्रास हा कोरोनाच्या लक्षणांप्रमाणे असल्याने गावकरीही त्याच्या मदतीला आले नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे गावकऱ्यांनी सत्य नारायणकडे तुझे मूळ गाव कोणते, कोणी नातेवाईक आहेत का अशी चौकशी केली. मात्र सत्य नारायणने आपलं या जगात कोणीच नसल्याचं सांगितलं. गावकऱ्यांना सत्य नारायणसंदर्भात पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत सत्य नारायणच्या घराला भेट दिली. त्यांनी सत्य नारायणची कानउघाडणी केली. पोलिसांनी त्यांचं मूळ गाव आणि नातेवाईकांसंदर्भात चौकशी केली असता सत्य नारायणला रडू कोसळलं आणि त्याने खरी माहिती सांगितली.

पोलिसांनी यांसंदर्भात माहिती कोडरमा पोलीस स्थानकामध्ये कळवली. त्यानंतर या व्यक्तीची पत्नी अनिता देवी पुत्र चंदेश्वर ही लिलोरी पथरा येथे आली. अनिता देवीने दिलेल्या माहितीनुसार पती बेपत्ता झाल्यानंतर तिने कोडरमा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली होती. आता २० वर्षानंतर पती सापडल्याने खूप समाधान वाटत असल्याचंही अनिता देवीने सांगितलं.


हे ही वाचा – पोलीस कॉन्स्टेबलने केला विवाहित महिलेवर बलात्कार; व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल


First Published on: August 13, 2020 3:22 PM
Exit mobile version