#JNUattack : गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनात रोहित पवार

#JNUattack : गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनात रोहित पवार
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी रात्री झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी जेएनयूमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अचानक हल्ला केला. यामध्ये काठ्या, लोखंडी सळया यांचा वापर केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे फीवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होते. तसेच, डाव्या विचारसरणीशी संबंधित असल्यामुळे या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, देशभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. मुंबई, पुण्यामध्ये देखील हल्ल्याविरोधात तरूण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक नेते, सेलिब्रिटी आणि सर्वच स्तरातल्या लोकांकडून हल्ल्याची निंदा केली जात आहे. सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे.
Pradnya Ghogale

जेएनयू घटनेच्या विरोधात गेट वे ऑफ इंडिया येथे सुरु असलेल्या आंदोलकांच्या समर्थनासाठी आमदार रोहित पवार त्याठिकामी दाखल झाले आहेत.

Pravin Wadnere

देशात जी अस्वस्थता आहे, तिच्यावर एकत्र येऊन विचार करायला हवा. या युवकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. बुरखाधारी डरपोक आहेत. जर त्यांच्यात हिंमत असती, तर त्यांनी तोंडावर बुरखा नसता घातला. जे कुणी असतील, त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा हल्ला २६/११ सारखा वाटला. असे हल्ले मी महाराष्ट्रात सहन करणार नाही. या गोष्टीसाठी जे कुणी जबाबदार आहेत, त्यांना शोधून शिक्षा देणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात चिंता करण्याचं कारण नाही. मी तरुणांना आश्वासन देतो, की अशी कोणतीही बाब मी महाराष्ट्रात सहन करणार नाही.मला राजकारणात पडायचं नाही. बुरख्याच्या पाठी जो कुठला चेहरा आहे, तो देशासमोर यायला हवा. पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर संशय येणारच.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

Pravin Wadnere

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ रविवारी रात्रीपासूनच जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तरूण जमा झाले आहेत. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आंदोलनात काही काळ सहभाग घेऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला…

Pravin Wadnere

दिल्ली महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस. जेएनयूमध्ये विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मागितलं स्पष्टीकरण..

Pravin Wadnere

दरम्यान, जेएनयूमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीने हिवाळी सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्प्याने विद्यापीठ सुरू होईल, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1214066632525410306

First Published on: January 6, 2020 11:59 AM
Exit mobile version