#JNUattack : गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनात रोहित पवार

#JNUattack : गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनात रोहित पवार
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी रात्री झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी जेएनयूमधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अचानक हल्ला केला. यामध्ये काठ्या, लोखंडी सळया यांचा वापर केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे फीवाढ विरोधी आंदोलनात सहभागी होते. तसेच, डाव्या विचारसरणीशी संबंधित असल्यामुळे या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, देशभरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. मुंबई, पुण्यामध्ये देखील हल्ल्याविरोधात तरूण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक नेते, सेलिब्रिटी आणि सर्वच स्तरातल्या लोकांकडून हल्ल्याची निंदा केली जात आहे. सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे.
Pravin Wadnere

जेएनयूमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथली छायाचित्र…

Pravin Wadnere

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. 'या हल्लेखोरांना ग्रीन सिग्नल दिला गेला होता यात कोणतीही शंका नाही. या लोकांनी त्यांचे चेहेरे झाकले होते आणि कॅम्पसमध्ये ते हातात रॉड आणि काठ्या घेऊन आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस या सगळ्यांना सुरक्षितपणे जाऊ देत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे', असं ओवैसी म्हणाले आहेत.

Pravin Wadnere

जेएनयूमध्ये रात्रभर तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली…

Pravin Wadnere

अभाविपने देखील केला प्रतिआरोप…

https://twitter.com/SwamiGeetika/status/1214017277424652288

Pravin Wadnere

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या हल्ल्याची निंदा केली आहे…

First Published on: January 6, 2020 11:59 AM
Exit mobile version