गुडन्यूज! बँकांमध्ये मेगाभरती

गुडन्यूज! बँकांमध्ये मेगाभरती

गुडन्यूज! बँकांमध्ये मेघाभरती

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतर्फे चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट भरती निघाली आहे. या मेगाभरतीमुळे आता बेरोजगार तरुणांना देखील रोजगार मिळणार आहे. यंदाच्या वर्षी बँकांमध्ये मार्चपर्यंत १ लाख नोकरभरती करण्यात येणार आहे. बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक या बँकांमध्ये मार्च २०१९ पर्यंत एक लाख नोकऱ्यांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

५० लाखांपेक्षा अधिक वेतन

बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार, बँक वेल्थ मॅनेजमेंट, अॅनालिटिक्स, स्ट्रॅटजी, डिजिटल, कस्टमर सर्व्हीसेस यांसारख्या स्पेशलाईज्ड कामांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामुळे आता खासगी सेक्टरमधील बँकांना टक्कर देण सोपे होणार आहे. या पदांसाठी वार्षिक वेतनाची मर्यादा ५० लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेली स्पर्धा पाहता व्यवसायात वाढ करण्यासाठी ही पावले उचल्याचे दिसून येत आहे. तसेच आता सार्वजनिक बँकांमध्येही आता चीफ एथिक्स ऑफिसर, चीफ मार्केटिंग ऑफिसर, चीफ इन्हेस्टमेंट ऑफिसर, चीफ लर्निंग ऑफिसर, हेड अॅनालिटिक्स, डिजिटल कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. आगामी काही तिमाहींमध्ये होणारी व्यवसायावृद्धी पाहता स्टेट बँकेतर्फे मोठ्या प्रमाणात नोकरभरती होण्याची शक्यता आहे. ‘टीमलीच’ च्या मते स्टेट बँकेत वरिष्ठ पदांव्यतिरिक्त एण्ट्री लेव्हलची मिळून पाच हजार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

बँकांमध्ये २० टक्के कर्मचारी लेखनिक दर्जाचे

सध्या सार्वजिनक बँकांमध्ये लेखनिकांची संख्या कमी आणि अधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे. नोकरभरती करण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘टीमलीज’च्या मते सध्या सार्वजनिक बँकांमध्ये केवळ २० टक्के कर्मचारी लेखनिक दर्जाचे आहेत. तर स्टेट बँक ही देशातील एकमेव अशी बँक आहे ज्यात लेखनिकांची संख्या ४५ टक्के आहे. ‘टीमलीज’च्या बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचे बिझनेस हेड सब्यसाची चक्रवर्ती यांच्या मते थकीत कर्जांच्या समस्येशी दोन हात केल्यानंतर सार्वजनिक बँका आता आजच्या जमान्यातील मुख्य व्यवसायावर लक्ष देण्यासाठी प्रवृत्त झाल्या आहेत. त्यातच व्यवसायात वाढ करण्यासाठी कारभारात बदल करण्याची गरज त्यांना वाटू लागल्याचे परिणाम दिसून येत आहे.

First Published on: December 18, 2018 12:27 PM
Exit mobile version