बिल्किस बानो प्रकरणातून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांची माघार, पुढे काय होणार?

नवी दिल्ली – बिल्कीस बानो प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी सुनावणीतून माघार घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणातील सुनावणीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणातील याचिकेवरील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

2002 मधील गुजरात दंगलीदरम्यान बिल्कीस बानो हिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. तसंच,तिच्यावरही बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी ११ जणांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काही कैद्यांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच सुटका करण्यात आली. यामध्ये बिल्की बानो प्रकरणातील ११ कैदीही सुटले गेले. या ११ कैद्यांना सुटकेविरोधात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. आज याच खंडपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी या सुनावणीतून माघार घेतली आहे.

9 जुलै 1992 च्या धोरणानुसार दोषींच्या मुदतपूर्व सुटकेच्या याचिकेवर दोन महिन्यांत उत्तर देण्याचे आदेश गुजरात सरकारला देण्यात आले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याच्या आवश्यकतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हा आदेश पारित केला, असा आरोप बिल्कीस बानो यांनी केला होता.

याचिकेत काय म्हटलं?

“बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका झाल्याने समाजाच्या विवेकबुद्धीला धक्का बसला आहे आणि त्यामुळे देशभरात निदर्शने झाली आहेत. सामूहिकरित्या कैद्यांना सोडण्याची परवानगी नाही. तसेच असा दिलासा मागणे किंवा अधिकाराची बाब म्हणून प्रत्येक दोषीच्या केसची वैयक्तिकरित्या, विशिष्ट तथ्ये आणि गुन्ह्यात त्यांनी बजावलेली भूमिका या आधारे तपासल्याशिवाय माफी दिली जाऊ शकत नाही.

First Published on: December 13, 2022 6:16 PM
Exit mobile version