ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनासदृश्य लक्षणं; रुग्णालयात दाखल

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनासदृश्य लक्षणं; रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे या दोघांमध्ये कोरोना सदृश लक्षणं आढळली आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना सोमवारी ८ जून रोजी साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना ताप आणि घशात जळजळ होत आहे. ही कोरोनाची लक्षणं असल्याकारणाने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला नाही आहे. अशी माहिती न्यूज एजेन्सी आयएएनएस दिली आहे.


हेही वाचा – मुंबईतील दुकानं उघडी ठेवण्यासंदर्भात नवा आदेश


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील आज कोरोनाची चाचणी केली जाणार होती. केजरीवाल यांना देखील ताप आणि घशामध्ये जळजळ होत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. शिवाय त्यांनी रविवारीच सर्व बैठका रद्द केल्या.

 

First Published on: June 9, 2020 3:04 PM
Exit mobile version