कमला हॅरिस यांनी पहिल्याच भाषणात केला भारताचा उल्लेख

कमला हॅरिस यांनी पहिल्याच भाषणात केला भारताचा उल्लेख

Kamala Harris Covid Positive : दोन बूस्टर डोस घेऊनसुद्धा कमला हॅरिस कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. मतदानानंतर मतमोजणीवरून बरेच दिवस पेच चालल्यानंतर अखेर अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा काल झाली. तसेच बायडन यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. निवडणुकीतील विजयानंतर कमला हॅरीस यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यांच्या या पहिल्याच भाषणात त्यांनी भारताचा उल्लेख केला.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. त्यांचा जन्म १९६४ मध्ये श्यामला गोपालन हॅरिस आणि वडील डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला होता. घटस्फोटानंतर आई श्यामला गोपालन यांनी कमला यांचा सांभाळ केला. निवडणूक निकालानंतर भाषण करताना, त्यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली. त्यावेळी, वयाच्या 19 व्या वर्षी माझी आई श्यामला गोपालन या अमेरिकेत आल्या, तेव्हा भविष्यात आजचा हा दिवस पाहायला मिळेल, अशी कल्पनाही त्यांन केली नसेल, असे म्हणत भारत ते अमेरिका आणि अमेरिका उपराष्ट्राध्यक्षांच्या मातोश्री या रंजक प्रवासाचं वर्णन कमला यांनी केले. मात्र, माझ्या आईला अमेरिकेवर तेवढाच विश्वास होता, त्यामुळेच हा क्षण प्रत्यक्षात उतरला, असेही कमला यांनी म्हटले आहे.

First Published on: November 8, 2020 11:57 PM
Exit mobile version