कंगणाला दणका, सगळ्याच टॉप ब्रॅण्डसनी करार केले रद्द

कंगणाला दणका, सगळ्याच टॉप ब्रॅण्डसनी करार केले रद्द

वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा रणौत हीने नुकताच एक खुलासा केला आहे. त्यात जाहीरात कंपन्यांच्या सगळ्याच ब्रॅण्डसनी तिच्याबरोबरचे करार रद्द केल्याचे तिने सांगितले आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटल्यावरही कंगणाबरोबर अनेक निर्माते व जाहीरात कंपन्यांनी करार रद्द केले होते.

मी त्वचा उजळ करणाऱ्या क्रिमची जाहीरात कधीच करत नाही. तसेच मी कधीही चित्रपटात आयटम नंबर करत नाही. असेही तिने सांगितले आहे. त्याचबरोबर सध्या जे काही मी कमावते ते मी दान करत असून समाजात देणगी देण्यासाठी कसे प्रेरित करू असेही तिने म्हटले आहे.

अमेरिकन पॉपस्टार सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनावर टि्वट केल्यानंतर कंगणाने तिला लक्ष्य केलं होतं. तसेच तिला मूर्ख म्हटलं होतं. तसेच रिहाना ही सुनिधी चौहान आणि नेहा कक्कर सारखी सामान्य गायिका आहे. तसेच ती डान्सही अश्लिल करते असं सांगत कंगणाने रिहानाच्या गाण्याच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उभारले आहे. यामुळे रिहानाचेही चाहते कंगणावर नाराज झाले आहेत.

First Published on: February 6, 2021 6:20 PM
Exit mobile version