देशभरात कारगिल विजय दिवस साजरी

देशभरात कारगिल विजय दिवस साजरी

कारगिल विजय दिनानिमित्ताने शहिदांना मानवंदना!

कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी कारगील युद्धात शहिद झालेल्या जवानांच्या द्रास स्मारक येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धाला यावर्षी २० वर्ष पूर्ण झाले आहेत. कारगिल विजय दिनानिमित्ताने शहिदांना आदरांजली वाहिली जाते. शुरवीर जवानांच्या प्रती कृतज्ञताची भावना व्यक्त करुन त्यांना मानवंदना दिली जाते. १९९९ साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन महिन्यांच्या युद्धानंतर पाकिस्तानच्या सैन्यांनी धुम ठोकली आणि भारताचा विजय झाला. या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. मात्र, भारतीय जवानांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही. या लढाईत भारताचा विजय झाला आणि तत्कालीन भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरी केला जातो. या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर कारगिल विजय दिनानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कर्नाटकाच्या शिवमोगा येथे जवानांचे प्रतिमा तयार करण्यात आल्या असून त्यामार्फत कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे.

First Published on: July 26, 2019 10:30 AM
Exit mobile version