कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल; अमित शाह यांचा दावा

कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल; अमित शाह यांचा दावा

नवी दिल्ली: Karnataka Election 2023: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मी कर्नाटकातील सर्व भागांचा दौरा केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सर्वच भागात भाजपकडे कल, उत्साह आणि पाठिंबा मोठा आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. ( Karnataka Election 2023 BJP to form government with absolute majority in Karnataka Amit Shahs claim )

काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शाह म्हणाले की, आमच्या पक्षाने ४ टक्के मुस्लिम आरक्षण संपवले आहे. कारण ते घटनाबाह्य होते. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. काँग्रेसने तुष्टीकरणाच्या धोरणाखाली मुस्लिम आरक्षण दिले होते, ते आम्ही काढून टाकले आहे. ते म्हणाले की, मला एवढेच सांगायचे आहे की जर तुम्हाला मुस्लिम आरक्षण 4% वरून 6% करायचे असेल तर ते कोणाचं आरक्षण कमी करणार हे कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट केले पाहिजे. ओबीसी, एससी, एसटी, लिंगायत की वोकलिंग, ते कोणाचं आरक्षण कमी करणार?

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आम्ही आरक्षण कमी करण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक केला आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये आम्ही काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. काँग्रेसला ते हटवायचे आहे. पण मी स्पष्ट करू इच्छितो की जे आरक्षण एससीच्या आरक्षणात आहे, ते हटवले जाणार नाही.

विशेष म्हणजे 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचाराचा दणदणाट सोमवारी सायंकाळी संपला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेसचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या जनता दलाने (सेक्युलर) मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

( हेही वाचा: अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्य पथा’वरील परेडमध्ये दिसणार फक्त महिला सैनिक? )

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आणि मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.

First Published on: May 8, 2023 9:30 PM
Exit mobile version