Karnataka Sex Tape Scandal : एचडी रेवण्णा यांच्याविरुद्ध अपहरण आणि लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल

Karnataka Sex Tape Scandal : एचडी रेवण्णा यांच्याविरुद्ध अपहरण आणि लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल

म्हैसूर : सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा हे फरार झाले असले तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. अशातच आता एचडी रेवण्णा यांच्यावर एका व्यक्तीने अपहरण आणि लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला बेपत्ता झाल्यानंतर या महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सदर महिलेचाही व्हिडीओ या सेक्स टेप स्कँडलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. म्हैसूर जिल्ह्यातील केआर नगर पोलीस स्टेशनमध्ये हेब्बालू गावातील रहिवासी राजूसह काही लोकांनी अपहरण आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. (Karnataka Sex Tape Scandal HD Revanna Case filed against kidnapping and sexual abuse)

मिळालेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी एचडी रेवन्ना यांच्या होलेनारसिपुरा येथे असलेल्या फार्महाऊसवर मोलकरीण म्हणून काम करत होती. सदर महिलेने सहा वर्ष रेवण्णा यांच्या घरी काम केल्यानंतर ती तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घरचे काम सोडून पुन्हा तिच्या गावात रोजंदारीवर काम करू लागली. मात्र 26 एप्रिल रोजी कर्नाटकात पहिल्या टप्प्यातील मतदारानाच्या तीन दिवस आधी सतीश बबण्णा हे सदर महिलेच्या घरी आले आणि त्यांनी या महिलेला पुन्हा कामावर येण्यासाठी विनवणी केली. रेवण्णा यांची पत्नी भवानी यांनी घरकामासाठी बोलावले असल्याचे सांगून सतीश बबण्णा हे सदर महिलेला घेऊन गेले आणि 26 एप्रिल रोजी सदर महिलेला घरी आणून सोडले. यावेळी त्याने महिलेच्या कुटुंबाला धमकी दिली की, जर पोलिसांनी विचारणा केली, तर त्यांना काहीही सांगू नका, असे महिलेच्या मुलाने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – चोरीचे सोने विकायला आला अन् जाळ्यात अडकला

राजूने एफआयआरमध्ये म्हटले की, 29 एप्रिल रोजी सतीश बबन्ना परत आला आणि त्याने माझ्या आईला सांगितले की, एका जुन्या प्रकरणात पोलीस माझ्या आईचा शोध घेत आहेत, अशी भीती दाखवून तो तिला जबरदस्ती घेऊन गेला. मात्र त्यानंतर प्रज्वल रेवन्ना यांच्याकडून त्याच्या आईवर लैंगिक अत्याचाराचे चित्रण करणारा व्हिडीओ राजूला मिळाला. याबाबत राजूने सतीश बबन्ना याला या प्रकरणी विचारला केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

राजूने म्हटले की, माझ्या आईची विचारपूस करण्यासाठी मी सतीश बबन्नाला फोन केला. त्यावेळी तो म्हणाला की माझ्या आईविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आणि मला तिच्यासाठी जामीन मिळावावा लागेल. मात्र अनेक दिवसांपासून आई बेपत्ता असल्याने अखेर राजूने एचडी रेवन्ना आणि बबन्ना यांच्याविरुद्ध अपहरणाची एफआयआर दाखल केली. केआर नगर पोलिसांनी एफआयआरमध्ये एचडी रेवन्ना यांचा आरोपी म्हणून, तर सतीश बबन्ना याचा भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत उल्लेख केला आहे.

हेही वाचा – महिलांनी बंद पाडला बिअर बार


Edited By – Rohit Patil

First Published on: May 3, 2024 6:06 PM
Exit mobile version