‘या’ राज्यात महाराष्ट्रासह आणखी ५ राज्यांच्या वाहनांना प्रवेश बंदी

‘या’ राज्यात महाराष्ट्रासह आणखी ५ राज्यांच्या वाहनांना प्रवेश बंदी

'या' राज्यात महाराष्ट्रासह सर्व वाहनांना प्रवेश बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात चौथ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, आता हा चौथा टप्पा संपत आला तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारने गुरुवारी एक मोठा आणि महत्तावाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रासह इतर पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक थांबवली आहे.

यासाठी घेण्यात आला हा निर्णय

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. मात्र, कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून आतापर्यंत २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे याठिकाणची सेवा हळूहळू सुरु करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरु आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे कोरोना प्रसारचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या राज्यातील सर्व वाहनांना प्रवेश बंदी

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना घरी आणण्यासाठी ‘त्याने’ पूर्ण विमान भाड्याने घेतले!


 

First Published on: May 28, 2020 7:37 PM
Exit mobile version