कसाब उत्तर प्रदेशाचा रहिवासी?

कसाब उत्तर प्रदेशाचा रहिवासी?

Ajmal Kasab

उत्तर प्रदेशातील सरकारी बाबूंनी दहशतवादी अजमल कसाब याला भारतीय करून टाकले आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी कसाब याच्या नावाने या बाबूंनी जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून प्रमाणपत्र जारी करणार्‍या कर्मचार्‍याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

बिधुना तहसील हद्दीतील आंबेडकर गावातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अजमल कसाबच्या जातीच्या आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या प्रमाणपत्रामध्ये कसाबचे जन्मगाव आंबेडकर नगर असे नोंद आहे. तर हे प्रमाणपत्र 21 ऑक्टोबर, 2018 मध्ये जारी करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसाबचा फोटोही लावण्यात आला होता. तरीही हे प्रमाणपत्र देताना अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. तसेच प्रमाणपत्र देतानाही पडताळणी करण्यात आली नाही. अर्जामध्ये कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिर तर आईचे नाव मुमताज बेगम देण्यात आले होते.

First Published on: November 19, 2018 5:17 AM
Exit mobile version