महाकाल एक्सप्रेसमध्ये बम बम भोले, महादेवासाठी सीट-६४ रिर्झर्व

महाकाल एक्सप्रेसमध्ये बम बम भोले, महादेवासाठी सीट-६४ रिर्झर्व

प्रवाशांना पर्यंटनाबरोबरच अध्यात्माचा आनंद घेता यावा यासाठी रेल्वेने महाकाल एक्सप्रेसमध्ये विशेष सेवा सुरू केली आहे. त्यासाठी महाकाल एक्सप्रेसच्या बोगी क्रमांक बी ५ मध्ये बर्थ क्रमांक ६४ भगवान शंकरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर एका बर्थवर छोटेखानी मंदिरही थाटण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष बर्थही बनवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारीच महाकाल एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. २० फेब्रुवारीपासून ही एक्सप्रेस सेवा सुरू होणार आहे.

ही एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा मंगळवारी आणि गुरुवारी वाराणसीहून सुटेल. तिथून ती लखनौ, कानपूर, भोपाळ, उज्जैन मार्गे इंदौरला पोहचणार आहे. इंदौरहून बुधवार आणि शु्क्रवारी उज्जैन, संत हिरदाराम नगर , बीना, कानपूर आणि लखनौहून वाराणसीला जाणार आहे. या ट्रेनमधली एक बर्थ कायमस्वरूपी भगवान शंकराच्या नावावर आरक्षित ठेवण्यात येणार आहे. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या धार्मिक भावनांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच प्रवासादरम्यानचे वातावरण अध्यात्मिक राहावे यासाठी प्रवाशांना भजन किर्तनही ऐकवले जाणार आहे त्यासाठी भजन मंडळांची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांना रेकॉर्डेट भजन आणि किर्तन ऐकवले जाणार आहे. काशी महाकाल एक्सप्रेसमध्ये विविध आठ तीर्थस्थळांसाठी पॅकेजही देण्यात येणार आहेत. वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, इंदौर, उज्जैन, भोपाळ येथील धार्मिक व पर्यंटनस्थळांसाठी आयआरसीटीसीसाठी पॅकेज तयार केले आहे.

First Published on: February 17, 2020 2:04 PM
Exit mobile version